नायगाव – नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी खुन करुन पळुन गेलेल्या आरोपीस ओका, व्दारका बंदर राज्य गुजरात येथील जहाजातुन केली अटक . अधिक माहितीनुसार नायगाव पोलीस ठाणे हद्दीतील सेनरजी हायजील कंपनी, कामण, वसई पूर्व, येथे काम करणारे कामगार दिलीप सरोज (मयत व सुनिल प्रजापती (आरोपी) यांना कंपनीचे मालक फिर्यादी प्रकाश मुंकर चामरिया यांनी दिनांक ०७/०९/२०२५ रोजी दोघांच्या जेवणाच्या खर्चासाठी एकत्रित रक्कम आरोपी सुनिल प्रजापती याच्या बँक खात्यात दिली होते. परंतु आरोपी सुनिल याने नमुदची रक्कम यातील मयत दिलीप सरोज यांस दिली नाही. सदर कारणावरुन त्यांच्या दोघांमध्ये वाद होवून सुनील प्रजापती याने दिलीप सरोज यास कोणत्या तरी साधनाने डोक्यास उजव्या व मागील बाजूस, दोन्ही डोळयांवरती, व उजव्या हातास गंभीर दुखापत केल्याने नायगाव पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील जखमी इसम दिलीप सरोज यांच्यावर उपचार चालु असताना मयत झाल्याने गुन्हयात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे दोन वेगवेगळे पथके बनवून आरोपी याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासा दरम्यान कौशल्यपूर्ण तपास करुन तसेच मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे गुन्हयातील आरोपी हा ओका, व्दारका बंदर, राज्य गुजरात येथील जहाजात आपले अस्तित्व लपवुन राहत असल्याबाबत निष्पन्न झाले. ओका बंदर, राज्य गुजरात येथील बंदरा लगत असणाऱ्या सुमारे २०० पेक्षा जास्त जहाजांची तपासणी करुन गुन्ह्यातील आरोपीसुनील खरपत प्रजापती, वय ३५ वर्षे, सध्या राहणार गाळा नंबर १४, सना इस्टेड, पंजाब ढाबाचे समोर, डोंगरीपाडा, कामण, ता. वसई जि. पालघर, मुळ राहणार- बडी कमरिया, काली मंदिराजवळ, जि. शहदतपुरी राज्य उत्तरप्रदेश यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी सुनिल प्रजापती यास अटक करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि/अभिजीत मडके हे करीत आहेत.
वरील कामगीरी मा.श्री. निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, मा.श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मा.श्रीमती पौणिमा चौगुले, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ २ वसई, मा.श्री. नवनाथ घोगरे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग, नायगाव पोलीस ठाणे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अभिजीत मडके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/गणेश केकान, पोउपनिरी/ज्ञानेश्वर आसबे, अनिल मोरे, सफी/बाबाजी चव्हाण, पोहवा/शेखर पवार, सचिन ओलेकर, सचिन मोहीते, पो.अंम. सचिन खंताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, पांडुरंग महाले, पोहवा/बाळासाहेब भालेराव, पोहवा/अमोल बरडे नेमणुक पो.उप आयुक्त सोो परिमंडळ नं ०२, वसई यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे.
