नालासोपारा : दिनांक ११/०९/२०२१ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, नालासोपारा (पुर्व), आचोळे रोड येथील डॉन लेन मधील एका किराणा दुकानचालकाने त्याच्या किराणा दुकानात प्रतिबंधीत केलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखु असा माल विक्रि करीता साठवणुक करुन ठेवलेला आहे.सदर मिळालेल्या बातमी वरिष्ठांना कळवून त्यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे छापा कारवाई करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान किराणा दुकानदार जुबेर अहमद मुशरफ हुसेन पटेल याच्या किराणा दुकानातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला व मानवी जिवीतास अपायकारक असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखु असा ५१८४०/-रु. किंमतीचा मुद्देमाल तसेच स्वीटी हाउस वेल्फेयर सोसायटी या बिल्डींग मधील रुम.क्र. ००१ मधुन तसेच स्वीटी हाउस चाळी मधील रुम मधुन ६,२२,६३८/-रु. किंमतीचा असा एकुण ६,७४,४७८/-रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन जुबेर अहमद मुशरफ हुसेन पटेल व सदरचा माल विक्री करणारा ईसम नवाजीस उस्मान अन्सारी यांचे विरुध्द तुळींज पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद दाखल करण्यात आला असुन नमुद २ आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास चालु आहे.
सदरची कारवाई डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. रामचंद्र देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक, श्री. देवीदास हंडोरे, सपोनि. विलास कुटे, मसपोनि. तेजश्री शिंदे नेम-भरोसा सेल, पोना. पवन पाटील, पो.शि.ज्ञानेश्वर चव्हाण, पोशि. विष्णुदेव घरबुडे, तसेच सफौ. बी. डी. चित्ते, पो.हवा. बी. एम. पवार नेमणुक-अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, नालासोपारा विभाग यांनी केली आहे.
