पालघर– अंमली पदार्थ MD ड्रग्ज बणविणारे व वितरण करणारे संपुर्ण रॅकेट स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलीस ठाणे यांचेकडून उध्वस्त करून २,४१,७४,९०२/- रुपये किंमतीचे ड्रग्ज व साधने जप्त. मा. श्री. नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत सरकार, मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यात नशामुक्ती अभियान सुरू केले आहे. त्याअनुषंगाने पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गणेश नाईक व विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई मा. श्री. संजय दराडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे मा. पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी मानवी जीवनावर परिणाम करणारे अंमली पदार्थ विक्री, तस्करी, साठा व उत्पादन करणारे इसमांच्या बाबत माहिती काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार दि.०८/०२/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराचे माहितीवरून केलेल्या कारवाईत मौजे बोईसर काटकरपाडा येथील कलरसिटी बिल्डींग नंबर १७ रुम नंबर १०३ या बंद रुम मध्ये इसम नामे अमान नईम मुराद, वय २९ वर्षे, रा. वसई हकिम मोहल्ला ता. वसई जि. पालघर मुळ राहणार भानेघर – मनोर, ता. जि. पालघर हा इसम मानवी आरोग्यास अपायकारक असलेला प्रतिबंधीत असलेली २,४१,६०,०००/-रु. किमंतीची १२०८ ग्रॅम वजनाची मॅफेड्रॉन (Mephedrone) नावाची पिवळसर पांढरट रंगाची पावडर व १४,९०२ /- रु. किमंतीचे साहित्य असे एकुण २,४१,७४,९०२/- रु. ( दोन करोड एक्केचाळीस लाख चौ-यात्तर हजार नऊशे दोन) रुपये किमंतीचा माल विक्री करण्याचे उद्देशाने निर्मीती करीत असतांना मिळुन आल्याने नमुद इसम व त्याच्या ताब्यातील MD अमंलीपदार्थ व साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याबाबत बोईसर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमान नईम मुराद यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन, त्याची दि.११/०२/२०२५ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि/अनिल व्हटकर, नेम. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर हे करीत आहेत.
आरोपी अमान नईम मुराद याचेकडे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान केलेल्या तपासात त्याने भाडयाने रुम घेवुन, तेथे मॅफेड्रॉन (Mephedrone) – MD नावाचे ड्रग्ज (अमली पदार्थ) तयार करण्यासाठी लागणारे रसायने वेगवेगळया ठिकाणाहुन मिळवुन ते बनविण्यासाठी लागणारे साहित्यजमा करुन, मॅफेड्रॉन नावाचे ड्रग्ज तयार करुन ते विक्रीसाठी त्याचे साथीदार १) कलीम शाकिर खान, वय २४ वर्षे, रा. आशिर्वाद मंजिल बिल्डींग, रुम नंबर २०१ काननगो इस्टेट, दिपक हॉस्पीटल जवळ, मिरारोड (पुर्व) ता.जि. ठाणे. मुळ रा. गांव – उतरोला, जि. गौंडा उत्तरप्रदेश. २) अमन आरिफ सय्यद वय २५ वर्षे, रा. रुम नंबर ००१ तळमजला डिप्लोमसी बिल्डींग काननगो इस्टेट, दिपक हॉस्पीटल जवळ, मिरारोड (पुर्व) ता. जि. ठाणे. ३) सनी राजकुमार सिंग, वय २९ वर्षे, रा. रुम नंबर ४०१ अ विंग न्यु पंचवटी अपार्टमेंट समोर, वोल्ड पेट्रोलपंप मिरा-भाईदंर रोड, शिवा गार्डन जवळ, मिरारोड ता.जि. ठाणे. मुळ रा. लोगनाथ चौक, प्रयागराज उत्तरप्रदेश यांना देत असल्याचे सांगीतल्याने, नमुद ०३ आरोपींना दि. ०९/०२/२०२५ रोजी सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मा. श्री. बाळासाहेब पाटील साो. पोलीस अधीक्षक पालघर, मा. श्री. विनायक नरळे साो. अपर पोलीस अधीक्षक पालघर व मा. श्री. विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार पोनि / शिरीष पवार, बोईसर पो.ठाणे, पोनि/प्रदिप पाटील स्थागुशा पालघर, सपोनि / सतिष आस्वर, सपोनि / अनिल व्हटकर, पोउनि / गणपत सुळे, पोउनि / स्वप्नील सावंतदेसाई, पोउनि / रोहीत खोत, पोउनि / रविंद्र वानखेडे, श्रे. पोउनि / राजेश वाघ, श्रे.पोउनि/सुनिल नलावडे, पोहवा / दिपक राऊत, पोहवा / संदिप सुर्यवंशी, पोहवा / नरेंद्र पाटील, पोहवा/संदिप सरदार, पोहवा/विजय ठाकुर, पोहवा/संजय धांगडा, पोना/ कल्याण केंगार, पोअमं/वैभव जामदार, पोअमं / प्रशांत निकम, नेम. स्थानिक गुन्हे शाखा पालघर व पथकाने केलेली आहे.
