भाईदर– उत्तरखंड राज्यातुन येवुन मुंबई व जवळचे परीसरातील वयोवृध्द महीलांना गाठुन त्यांना बोलण्यात गुंतवुन त्याचे अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करुन १७ तोळे वजनाचे १४,२३,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने केले हस्तगत. दिनांक ०२.०२.२०२५ रोजी ११.१५ वा. च्या सुमारास फिर्यादी दिनाक्षी पाटील वय- ५० वर्षे रा. काशिनगर, भाईदर पूर्व ह्या दुकानातुन सामान घेवुन खंडोबाची बिल्डींग, काशिनगर, भाईदर पुर्व येथुन घरी पायी जात असताना आरोपीने त्यांना बोलण्यात गुंतवुन व दिशाभुल करुन हात चलाखीने तिचे गळयातील सोन्याची चैन व कानातील सोन्याची फुले पिशवीत घालण्यास सांगुन फसवणुक करुन सोन्याचे दागिने घेवुन पळून गेला त्याबाबत नवघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यवर्ती गुन्हे कक्षाचे पोलीस पथकाने गुन्हयाचे घटनास्थळाचे सीसीटिव्ही फुटेज पडताळणी करुन आरोपी हे उत्तराखंड राज्यातील असल्याचे निष्पन्न करुन त्यानंतर मिळालेली माहीती व तांत्रीक विष्लेषनात आरोपी हे गुन्हा केल्यानंतर रेल्वे प्रवास करीत असल्याची माहीती मिळाल्याने रेल्वे सुरक्षा बलाचे मदतीने आरोपी १) आयुब कलुवा हसन वय – २६ वर्षे २) फारुख अली लोहरी शाह वय- ३४ वर्षे ३) नौशाद अलीमुद्दीन हसन वय २८ वर्षे ४) जलालुद्दीन लोहरी शाह, वय – ४५ वर्षे, सर्व राह. उधमसिंग नगर, राज्य उत्तराखंड यांना गांधीनगर रेल्वे स्टेशन, गुजरात येथुन दिनांक ०६.०२.२०२५ रोजी ताब्यात घेण्यात आले आहेत.
नमुद आरोपीकडुन १७ तोळे वजनाचे १४,२३,००० /- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच गुन्हा करताना वापरलेल्या १,१५,००० /- रुपये किमतीच्या ०२ मोटार सायकल, रोख रक्कम २,३५७/- रुपये व २७,०००/- रुपये किमतीचे ०४ मोबाईल फोन असा एकुण १५,६७,३५७/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. नमूद आरोपी यांच्या केलेल्या तपासात त्यांनी १.नवघर पोलीस स्टेशन, २.मुलुंड पोलीस स्टेशन, ३.टिळक नगर पोलीस, ४.कांदीवली पोलीस स्टेशन ५.घाटकोपर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अविनाश अंबुरे व सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. श्री. मदन बल्लाळ याच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे कक्षाचे प्र. पो. निरी. अविराज कुराडे, सपोनिरी/दत्तात्रय सरक, प्रशांत गांगुर्डे, नितीन बेद्रे, सहापोउपनिरी/श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, पोहवा/ संतोष मदने, शिवाजी पाटील, विजय गायकवाड, रविंद्र भालेराव, गोविंद केंद्रे, विकास राजपुत, संदिप शेरमाळे, प्रविणराज पवार, हनुमंत सुर्यवंशी, समीर यादव, रविंद्र कांबळे, नितीन राठोड, सफौ/संतोष चव्हाण, मसुब सचिन चौधरी तसेच मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. संजय चौधरी, वपोनिरी. सुमेर सिंग, पोहवा / मोगल नेमणुक रेल्वे सुरक्षा बल, गांधीनगर, गुजरात यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे.
