विरार– अनोळखी मृतदेहाची ओळख पटवुन खुनाचा गुन्हा २४ तासाच्या आत उघड करुन आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा कक्ष- ३ विरार यांना यश.अधिक माहितीनुसार मांडवी पोलीस ठाणे हद्दिमध्ये दि. १३.०३.२०२५ रोजी कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून कोणत्यातरी अज्ञात हत्याराने अनोळखी महिलेचा धडापासून गळा कापून तीचे मुंडके धडापासुन वेगळे करुन खुन केला आहे. व तीचे धड पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने इतरत्र कोठेतरी टाकून मुंडके गोण्यांमध्ये व जांभळया रंगाच्या ट्रॅव्हलींग बॅगेत भरून मांडवी पोलीस ठाण्याचे हद्दीत पिरकुंडा दर्गापासून १०० मिटर अंतरावर रोडचे कडेपासून ३० फुट अंतरावर खोलगट व झाडेझुडपे असलेल्या जागेत टाकून पुरावा नष्ट केला म्हणून त्याबाबत दि.१४/०३/२०२५ रोजी मांडवी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवुन लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणणे बाबत मा. वरिष्ठांनी पोलिसांना आदेशीत केले होते. तसेच मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये नमुद गुन्हयाच्या घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देवुन त्या ठिकाणी एका ज्वेलरी शॉपचे पाकीट प्राप्त झाले होते. सदर पाकिटावरील ज्वेलरी शॉपचे मालकाला संपर्क करुन त्यांचेकडील गिऱ्हाईकांबाबत माहिती घेतली असता महिला ही तिचे परिवारासह मुंबई परिसरात राहत असल्याचे समजले. त्याआधारे सदर महिलेची व तिचे परिवाराची माहिती काढली असता सदरचा परिवार हा मागील काही दिवसांपासुन त्यांचे पत्यावरुन इतर ठिकाणी राहवयास गेल्याने कोणतीही ठोस माहिती उपलब्ध होत नव्हती. सदर कुटूंबाची त्यांचे पुर्वी राहत असलेल्या पत्यावरुन पश्चिम बंगाल येथील नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी महिला नामे सौ. उत्पला हरिश हिप्परगी, वय ५१ वर्षे, मुळ रा. नैहाटी, जिल्हा उत्तर २४ परगणा, राज्य पश्चिम बंगाल ही तिचे पती हरिश बरवराज हिप्परगी यांचे सोबत राहत असुन तिच्याशी दोन महिन्यापासुन संपर्क होत नसल्याचे सांगीतले. त्याअनुषंगाने मिळालेल्या गोपणीय माहितीवरुन इसम हरिश बरवराज हिप्परगी, वय ४९ वर्षे, धंदा- इमीटेशन ज्वेलरी, रा. रोनक अपार्टमेंट, रुम नं. बी / १०१, रेहमत नगर, नालासोपारा पूर्व मुळ रा. कर्नाटक याला नालासोपारा पूर्व परिसरातुन ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केल्यानंतर समजले की, मयत महिला ही त्याची पत्नी असुन गेल्या काही महिन्यांपासुन त्यांचेत कौटुंबीक वाद होते. दि.०८/०१/२०२५ रोजी रात्री देखील त्यांच्या मध्ये घरगुती कारणावरुन भांडण झाले त्यामुळे नेहमीच्या भांडणाला कंटाळुन आरोपी याने रागाच्या भरात रात्री ०३:०० वाजेच्या सुमारास त्याचे पत्नीचा गळा दाबुन तिला जिवे ठार मारुन तिचे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे हेतुने मुंडके शरिरापासुन वेगळे करुन ते एका ट्रॅव्हल बॅग मध्ये टाकुन झाडाझुडपात फेकुन दिले व बाकी शरीर हे देखील एका गोणीत भरुन दुसरीकडे फेकले असल्याचे आरोपी कडुन समजले आहे. आरोपी हरिश बरवराज हिप्परगी, वय ४९ वर्षे याला पुढील कारवाई करीता मांडवी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात येत आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्री संजय हजारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांडवी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त सो., मा. श्री दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त सो., मा. श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त सो., (गुन्हे), मा. श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त सो (गुन्हे) मि. भा. वि. व पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक / शाहुराज रणवरे, सहा.पो.निरी. / सुहास कांबळे, पो.हवा./ मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, पो. अं./ राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, म. सु. ब. / सागर सोनवणे, प्रविण वानखेडे, गणेश यादव सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष ३ तसेच स.फौ. / संतोष चव्हाण नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.
