वसई – वसई वाहतुक शाखेकडुन रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती अभियान व मार्गदर्शक सत्राचे आयोजन. अधिक माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार तसेच रस्ता सुरक्षा महीना जानेवारी २०२६ च्या अनुशंगाने महाराष्ट्र पोलीस दल मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत, वसई वाहतुक नियंत्रण शाखा, वसई यांच्या वतीने दिनांक ३१/०१/२०२६ रोजी रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती अभियान व मार्गदर्शक सत्राचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करणे, नागरिकांमध्ये विशेषतः तरुण च विद्यार्थी वर्गामध्ये वाहतुक नियमांनविषयी जागरुकता निर्मान करणे, तसेच सुरक्षित वाहन चालविण्याच्या सवयी रुजविणे हा होता. कार्यक्रमात रस्ता सुरक्षेशी निगडीत विविध महत्वांच्या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती एंझा डायस (लेक्चरल ह्युमीनीटी आणि सायन्य) यांच्या प्रस्तावनेने झाली. त्यांनी रस्ता सुरक्षेचे महत्व अधोरेखित करत उपस्थित विद्यार्थ्यांना कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहान केले. मार्गदर्शक सत्रात डॉ. रिता साचला, राधे फाउंडेशनचे प्रमुख यांनी आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी, रस्ता अपघात झाल्यास १०८ व १२२ या आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकावर तात्काळ संपर्क कसा साधावा, कॉल करताना कोणती माहीती दयावी. अपघातग्रस्त व्यक्तीस सुरक्षितरीत्या कशी मदत करावी, तसेच जखमी व्यक्तीस वेळेत रुग्णालयात पोहचविण्याचे महत्व याबाबत संविस्तर व प्रात्यक्षिक स्वरुपात मार्गदर्शन केले.
तसेच पोलीस उप निरीक्षक/मेहबूब तडवी यांनी विद्यर्थ्यांना संबोधित करताना, रस्ता अपघांताची प्रमुख कारणे, वेग मर्यादा पाळण्याचे महत्व, दुचाकी स्वार यांनी हेल्मेट वापरणे, चारचाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर करणे, मद्यपान करुन वाहन चालविण्याचे दुष्परिनाम, तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास होणाया कायदेशिर कारवाई बाबत सविस्तर माहीती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना जवाबदार नागरिक म्हणुन वाहतुक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास श्री. एन. के कव्हाले (प्रिन्सीपल), श्री. अनुराग राठोड (लेक्चरल ए.आय डिपार्टमेंट) , श्री. एस. व्ही. गोसावी (एच ओ डी. सिव्हील),श्री. के.ए मोकाशी (लेक्चरल कम्प्युटर डिपार्टमेंट) , श्रीमती एंझा डायस (लेक्चरल ह्युमीनीटी आणि सायन्य) , पोउपनि/मेहबुब तडवी , पोशि/ भिमराज घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सदर जनजागृती कार्यक्रमास एकूण ६०० ते ६५० विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी वाहतुक नियमाचे पालन करण्याचा व रस्ता सुरक्षेचा प्रचार करण्याचा संकल्प केला. रस्ता सुरक्षा महीना जानेवारी २०२६ अंतर्गत आयोजन करण्यात आलेले हे जनजागृती अभियान अत्यंत यशस्वीपणे पार पडले असून, रस्ता अपघात रोखण्यासाठी जनजागृती व नियमांचे पालन हाच सर्वोत्तम उपाय आहे. असा ठाम संदेश या कार्यक्रमातुन देण्यात आला आहे.


