भिवंडी : पेल्हार परीसरात गांजा ची तस्करी वर कारवाई करताना पेल्हार पोलिसांनी ऑटो रिक्षातून गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करताना तीन आरोपींना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे . पोलीस निरीक्षक श्री. शाहुराज रणवरे यांना विश्वसनीय बातमीदाराकडून पेल्हार परीसरात गांजा तस्करीबाबतची माहीती मिळाल्याने वरिष्ठांचे मार्गदर्शन व परवानगीने पेल्हार डोंगरपाडा, अल्फा कॉलनी चाळ जवळील रस्त्यावर गुन्हे शाखेचे पथक रवाना करुन सापळा रचून १) सत्यम श्रीपाल गुप्ता रा. शांतीनगर रोड, ता. भिवंडी२) आनंद उर्फ पवन वेदप्रकाश शुक्ला रा. ता. भिवंडी, व ३) विशेष राजेश तिवारी, रा. भिवंडी यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळ असणारी रिक्षाची तपासणी केली असता रिक्षाच्या ड्रायव्हर सिट खाली गांजा हा अंमली पदार्थ एकुण वजन ७ किलो ८९० ग्रॅम प्लास्टीक पिशवीमध्ये मिळुन आल्याने विरळ आरोपींना मुद्देमाला सकट तसेच गांजा तस्करीसाठी वापरण्यात आलेली ऑटो रिक्षा एकुण ३,९७,२५०/- रु. किंमतीचा मुददेमाल सपोनी रणजितसिंग परदेशी यांनी दोन पंचांसमक्ष ताब्यात घेतला असुन सदर आरोपींविरुध्द पो.हवा./जगदिश एकनाथ गोवारी नेम. गुन्हे शाखा-२ वसई युनीट, यांनी सरकार तर्फे कायदेशिर तक्रार दिली असुन त्याबाबत पेल्हार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे व पुढिल तपासा पेल्हार पोलीस ठाणे हे करित आहे.
सदरची कारवाई डॉ. श्री महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा-२ वसई युनीटचे पोलीस निरीक्षक श्री शाहुराज रणवरे, सपोनिरी/ रणजितसिंग परदेशी, सपोनिरी/ सुहास कांबळे, पो.हवा./ मंगेश चव्हाण, पोहवा/ संजय नवले, पो.हवा./ महेश पागधरे, पोहवा/सचिन पाटील, पो.ना./ जगदीश गोवारी, पो कॉ/ दादा आडके, पो कॉ/ सुधीर नरळे यांनी केली आहे.
