कमी कालावधीचे ऑनलाईन कर्ज घेण्यापासुन सावधान – मिरा-भाईंदर, वसई-विरार सायबर गुन्हे शाखा.

Cyber Crime

दिनांक : २३/०२/२०२२ सध्या विविध ऑनलाईन अॅपव्दारे नागरिकांना Short Time Online Loan ( कमी कालावधीचे ऑनलाईन कर्ज ) घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात येत असून वेगवेगळया प्रकारच्या ऑफर देवुन कमी व्याजदर ठेवुन कमी वेळेत लोन (कर्ज) मंजुर करुन देतो अश्या प्रकारचे विविध आमिष दाखवून सामान्य जनतेस ऑनलाईन कर्ज  घेण्यास भाग पाडले जात आहे. नागरिकांना सदर कर्ज घेण्याकरीता त्यांच्या कंपनीचा अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास सांगुन त्यांचे मोबाईल मधील महत्वपुर्ण माहिती ( Gallery, Phone List, Photo-Video, Etc.) संबंधीत कंपनीस शेअर करण्याचे बंधन ठेवुन नागरीकांना कर्ज मंजुर केले जाते. त्यानंतर सदरील व्यक्तीने संबंधीत कंपनींचे लोन (कर्ज) फेडल्यानंतर देखिल त्यांना अधिकची रक्कम भरण्याची सक्ती केली जाते व ग्राहकाने त्यास विरोध केल्यास सदर लोन मंजुर करतेवेळी ग्राहकाने सादर केलेल्या त्याचे फोनमधील Gallery, Phone List, Photo-Video, Etc ( गॅलरी, फोन लिस्ट, फोटो-व्हिडीओ) माहितीव्दारे सदर नागरीकांस व त्याचे नातेवाईक- मित्रमंडळी यांना शिवीगाळ, अश्लिल फोटो/व्हिडीओ पाठवुन अधिकचे पैसे भरण्याची धमकी दिली जात असल्याबाबतच्या बाबी लक्षात आलेले आहेत.

सदर घटनेच्या अनुषंगाने मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे सायबर गुन्हे शाखेकडुन नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही अनधिकृत अॅपव्दारे लोन ( कर्ज ) घेवु नका व Short Time Online Loan ( कमी कालावधीचे ऑनलाईन कर्ज ) अश्या स्वरुपाचे आमिषाला बळी पडण्यापासुन सावधान रहा! त्याचप्रमाणे कुणासोबत असा प्रकार घडल्यास नजीकच्या पोलीस ठाणे किंवा सायबर गुन्हे शाखा, मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीसांशी संपर्क साधावा असे पोलिसांमार्फत नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे .

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply