काशिमीरा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.

Crime News Cyber Crime Latest News Political News ताज्या घडामोडी

मिरारोड  – ऑनलाईन लोन ऍप च्या माध्यमातुन वॉलेटमध्ये जमा झालेले लोनचे पैसे काढण्यासाठी तक्रारदार यांचेकडुन अनोळखी आरोपींनी रु. ३,२९,७५०/- इतकी रक्कम घेवुन फसवणुक झालेली असताना संपुर्ण रक्कम रु. ३,२९,७५०/- ही तक्रारदारांना परत करण्यात काशिमीरा पोलीस ठाण्यास यश.सविस्तर माहीती अशी की, मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पोलीस स्टेशन परीसरात राहणारे दर्शन जगदीश व्यास, रा. टि. शांती गार्डन, मिरारोड पुर्व, ठाणे यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी गुगलवरुन क्रेडीट इन्स्टॉलमेंट लोन अॅप व वॉलेट हे थर्ड पार्टी  ऍप्लीकेशन डाउनलोड केले व त्यानंतर ऑनलाईनरित्या अनोळखी इसमाच्या सांगण्यावरुन वॉलेटमधील पैसे काढण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगुन एकुण रु. ३,२९,७५०/- रुपये इतकी रक्कम वेगवेगळया बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त करुन व्यास यांना कोणत्याही प्रकारचे लोन न देता व पाठवलेले पैसे ही परत न करता फसवणुक केली म्हणून काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या तक्रारी बाबत तात्काळ गुन्हा दाखल करुन घेवून तक्रारदार यांचे झालेल्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळया बँक खात्यात ट्रान्सफर झाल्याचे दिसुन आले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बँकेसोबत पत्रव्यवहार करुन संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर मा. न्यायालयाकडुन तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्या करीता काशिमीरा पोलीस ठाणेचे अधिकारी / अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार यांची फसवणुक झालेल्या संपुर्ण रक्कम ३,२९,७५०/- रुपये रक्कम त्यांच्या खात्यावर परत मिळविण्यात आली आहे.

अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…

  • अशा प्रकारे फसवे कॉल अथवा एसएमएस प्राप्त झाल्यास त्यावर कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देवु नये.
  • आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणारे एसएमएस, ईमेल, कॉल्स यांची विश्वासहर्ताची पडताळणी करावी.
  • आपले मोबाईलवर प्राप्त होणारा OTP किंवा आपली वैयक्तीक माहिती देवु नये.
  • तसेच फसवणुक झालेचे लक्षात येताच लागलीच नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,
  • कोणतेही अनाधिकृत ऍप्लीकेशन डाऊनलोड करु नये अथवा अनोळखी लिंकवर क्लिक करु नये.
  • ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्या सोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.

सदरची कामगिरी श्री. प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परि ०१, मिरा रोड, श्री. विजय कुमार मराठे, सहा.पोलीस आयुक्त, मिरा रोड विभाग यांच्या  मार्गदर्शनाखाली श्री राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल चौगुले, पो हवा / दिनेश आहेर व पो.शि. / प्रदिप काटकर यांनी पार पाडली आहे.

सायबर फसवणुक हेल्प लाईन क्रमांक :- १९३०

सायबर फसवणुक हेल्पलाईन वेबसाईहट – www.cybercrime.gov.in

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.