भाईंदर येथील मोबाईल दुकान फोडून चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला १४,५६,३००/- रकमेसह पोलिसांनी केली अटक व टाटा एस डंपर चोरी करणाऱ्या सराईताला पोलिसांनी केली अटक.

Crime News Cyber Crime Latest News Political News ताज्या घडामोडी

भाईंदर (दि.२८)- भाईंदर पोलीस ठाणे गुन्हे शाखा कक्ष-१, काशिमीरा  यांनी भाईंदर येथील मोबाईल दुकान फोडुन त्यातुन १६,७१,३००/- रुपये किमतीचे मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस १४,५६,३००/- मुद्देमालासह दिल्ली येथुन अटक केली तसेच भाईदर येथुन चोरीस गेलेला टाटा एस. डंपर चोरी करणाऱ्या इसमाचा शोध घेवुन चोरी गेलेला ट्रक जालना येथुन हस्तगत करण्यात यश.मिळालेल्या माहीतीनुसार दिनांक २०/०३/२०२४ रोजी रात्रौ १०.०० ते दिनांक २१/०३/२०२४ सकाळी १०.०० वा च्या दरम्यान श्री चिराग जगदीश अनडा वय – ३६ वर्षे, व्यवसाय मोबाईल शॉपी, रा.न्यु गोल्डन नेस्ट रोड, भाईंदर पुर्व, ता. जि. ठाणे यांचे जे. जे. मोबाईल शॉप, ०१ अप्लेश बिल्डींग, खाऊ गल्ली स्टेशन रोड, भाईंदर पश्चिम याठीकाणी असुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या दुकानाचे भिंतीलगत असलेली लोंखडी ग्रील व प्लाय तोडुन त्यावाटे प्रवेश करुन सुमारे १६,७१,३००/- रुपये किंमतीचे नविन मोबाईल फोन चोरी केले याबाबत भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.त्याचप्रमाणे दिनांक १२ ते १३/०३/२०२४ सकाळी ०८.०० वा. दरम्यान भोलानगर जवळ, उत्तन ते भाईंदर पश्चिम येथील सुरेश त्रिंबक मंजुरकर वय ३४ वर्षे धंदा- डम्पर चालक, रा घर नं. ३, गंगाधर शेठ चाळ, गायमुख घोडबंदर रोड, ता. वरदरी बु. पोस्ट – जवळुका ता मालेगाव जि. वाशिम यांच्या मालकीचा ३,००,०००/-रु. किंमतीची एक टाटा एस डम्पर चोरी झाल्याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन  भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर दोन्ही गुन्ह्यांची मा.वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा मार्फत समांतर तपास करीत असताना पडताळणी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रीक विश्लेषन करुन त्यापासुन प्राप्त माहीती तसेच गुप्त बातमीदार यांच्या मार्फत मिळालेल्या माहितीवरुन हा गुन्हा करणारा आरोपी फिरोज ऊर्फ मोनु खान रा. बांद्रा पश्चिम हा असल्याचे निष्पन्न झाले व तो तो बिजनौर, उत्तर प्रदेश येथे गेला असल्याचे पोलिसांना समजल्याने लागलीच पोलीस पथक रवाना करण्यात आले. तपासा दरम्यान आरोपी दिल्ली येथे गेला असल्याची माहीती मिळाली. त्याप्रमाणे दिल्ली येथे जावुन पोलीस मदत मिळवून आरोपी फिरोज ऊर्फ मोनु नईम खान यास ताब्यात घेवुन गुन्ह्यातील चोरी केलेल्या २४ मोबाईल पैकी १४,५६,३००/- रुपये किमतीचे २२ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच त्यांचेकडे केलेल्या चौकशी मध्ये त्याने नवघर पोलीस ठाणे येथील दाखव  गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच ट्रक चोरीच्या गुन्हयांचे घटनास्थळापासुन चोरी करणारा इसम सदर ट्रक घेवुन जात असलेल्या भाईंदर ते परभणी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन तांत्रीक विश्लेषन करुन गुन्हयांतील डंपरचा पोलिसांनी देवाशिष पेट्रोल पंप परभणी पर्यंत शोध घेतला. त्यानंतर सदर परिसरातील वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्य़ा आरोपींची माहीती गोळा केली असता त्यातील आरोपी  वैजनाथ लक्ष्मण लांडगे वय – ६७ वर्षे, रा. साईबाबा नगर, परभणी यांचा पोलीसांना संशय आल्याने तांत्रीक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा त्यानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी वैजनाथ लक्ष्मण लांडगे याचा शोध घेतला असता त्याचा मोटार अपघात होवुन तो गंभीर जखमी झाल्याने परभणी येथे हॉस्पीटल मध्ये अॅडमीट आहे. आरोपी याने सदरचा डंपर हा चंद्रकांत गणपतराव जाधव रा. जालना यांना विक्री केलेला असुन सदरचा डंपर हा हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मा. श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त साो, गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा येथील पो.निरी अविराज कुराडे, सपोनिरी प्रशांत गांगुर्डे, सपोनिरी पुष्पराज सुर्वे, पो.उप- निरी. राजु तांबे, सफौ संदीप शिंदे, पोहवा अविनाश गर्जे, पो.हवा  संजय शिंदे, पोहवा संतोष लांडगे,पोहवापुष्पेंद्र थापा, पो. हवा. सचिन हुले, पोहवा सचिन सावंत, पो. हवा. विजय गायकवाड, पो.हवा/समिर यादव, पो.हवा. सुधीर खोत, पो.हवा. विकास राजपुत, पो.कॉ. प्रशांत विसपुते, पो.कॉ. सनी सुर्यवंशी, पोशि गौरव बारी, पोशि सौरभ इंगळे, पो.शि. धिरज मेंगाणे, सफौज. सतोष चव्हाण सायबर विभाग यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास भाईंदर पोलीस ठाणे मार्फत करण्यात येत आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.