विरार – राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी दरोडा टाकुन ५.१५ कोटी रोख रक्कमेची लुट करणा-या आरोपींना शिताफीने अटक करुन गुन्हा ऊघडकीस आणण्यात कक्ष-३, गुन्हे शाखेला यश.अधिकमाहीती नुसार दिनांक १७/०३/२०२४ रोजी गुजराती व्यापारी त्यांच्या तीन कर्मचारी यांच्याबरोबर पाच कोटी पंधरा लाख रुपयांची रोख रक्कम हुंडाई क्रेटा कार मधून सुरत येथून मुंबई मध्ये नेत असताना रात्री ०८:०० वा. ते ०९:०० वा. च्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ च्या मुंबई वाहिनीवरील खानिवडे टोल प्लाझाच्या पुढे एका मारुती वॅगन आर कारमधून आलेल्या पाच अनोळखी इसमांनी क्रेटा कार मध्ये बसलेले फिर्यादी व साक्षीदार यांना पोलीस असल्याची बतावणी करुन मारहाण केली. त्यानंतर कारमध्ये असलेल्या तीघांपैकी एकाला आरोपींनी स्वत:च्या वॅगन आर कारमध्ये बसवले. तसेच कारमध्ये असलेली रोख रक्कम आणि इतर दोन साक्षीदार यांच्यासह हुंडाई क्रेटा कार जबरदस्तीने ताब्यामध्ये घेऊन आरोपीं निघून गेले. दरम्यान आरोपींनी क्रेटा कारमध्ये असलेल्या दोन साक्षीदारांना मारहाण व दमदाटी करुन त्यांचे मोबाईल फोन फेकून देऊन त्यांना वेगवेगळ्या टप्यावर कारमधून उतरवले व रोख रकमेसह कार घेऊन पळून गेले. याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन मांडवी पोलीस ठाणेत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्यादरम्यान दरोडयाचा गंभीर गुन्हा असल्याने मा. वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हयाचा तपास कक्ष – ३, गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. त्यानुसार तांत्रीक विश्लेषण आणि बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे दिनांक १९/०३/२०२४ रोजी आरोपी १) मुरगनंदन अभिमन्यु, वय ४६ वर्षे, रा. माटुंगा, मुंबई २) बाबु मोडा स्वामी, वय ४८ वर्षे, रा. कांदिवली पश्चिम, मुंबई ३) मनीकंडन चलैया, वय ५० वर्षे, रा. भाईंदर पुर्व, ४) बालाप्रभु शनमुगम, वय ३९ वर्षे, रा. सायन, मुंबई यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपी यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तपासामध्ये त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली असून, दिनांक २८/०३/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी मंजुर आहे. तपासादरम्यान फरार आरोपी निष्पन्न करण्यात आले असून, त्यांचा तपास सुरु आहे.सदर आरोपींन कडुन पोलिसांनी १) ४,८७,५०,०००/- ( चार कोटी सत्यांशी लाख पन्नास हजार रुपये) रोख रक्कम २) १०,००,०००/- रुपये किमतीची ह्युंदाई क्रेटा कार रजिस्ट्रेशन क्र. जीजे-३३-एफ ५९०६ ३) ३,००,०००/- रुपये किमतीची मारुती वॅगन आर कार रजिस्ट्रेशन क्र. एमएच ४३ – बीयु – ००८० ४) २,६५,०००/- रुपये किमतीचे मोबाईल फोन असे एकुण ५,०३,१५,०००/- (पाच कोटी तिन लाख पंधरा हजार) रुपये हस्तगत केले आहे. तसेच आरोपी मुरगनंदन अभिमन्यु याचा पुर्वइतिहास पडताळुन पाहता अटक आरोपी मुरगनंदन अभिमन्यु हा धारावी पोलीस ठाणे येथे खुनाच्या गुन्हयातील दोषसिध्द आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी श्री. मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय, श्री. श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त, श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त सो., (गुन्हे), श्री. मदन बल्लाळ सहा. पोलीस आयुक्त सो (गुन्हे) मि. भा. वि. व पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोउपनिरी अभिजित टेलर, उमेश भागवत, पोहवा अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पो.अं. राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, तुषार दळवी, अतिश पवार, मनोहर तारडे, म. सु.ब प्रविण वानखेडे गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष- ३ तसेच सफौ संतोष चव्हाण, सायबर सेल यांनी पार पाडली आहे.
