मिरारोड – मोटर साकयल चोरी करणा-या रेकॉर्ड वरील सराईत आरोपीस अटक करुन गुन्हयातील २ मोटर सायकल हस्तगत करुन इतर २ गुन्हा उघड करण्यात मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश. अधिक माहीतीनुसार,मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणा-या ज्योती अरविंद सिंग वय ४२ वर्षे, रा.रुम नं.९०२ बी/३, मॅनओपस सोसा. मिरारोड पुर्व ता. जि. ठाणे ह्या दिनांक १७/०३/२०२४ रोजी सायंकाळी ०७.३० वाजताच्या सुमारास त्यांची भाची संगवी सिंग हिस पाळणा खेळवण्यासाठी मोटर सायकल घेवुन शिवार गार्डन येथे गेल्या व शिवार गार्डनच्या बाहेरील रस्त्यावर त्यांनी मोटर सायकल पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करुन नेली म्हणुन त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन मिरारोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाच्या घटनास्थळावरुन ज्योती सिंग यांच्या व्यतिरिक्त आणखी एक मोटर सायकल चोरीस गेल्याबाबत मिरारोड पोलीस ठाणेत तक्रार नोंदवली गेली हे पोलिसांच्या निर्दशनास आल्याबरोबर सदरबाबत मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नमुद दोन्ही गुन्हे एकाच घटनास्थळावरुन घडलेले असल्याने वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळावरील सी. सी. टी. व्ही फुटेजची पाहणी केली असता नमुद दोन्ही गुन्हे करणारा मिरारोड पोलीस ठाणेवरील चोरी व जबरी चोरी चे गुन्हे करणारा सराईत आरोपी अल्ताफअली युनुस खान वय ३९ वर्षे रा. शॉप नं. १०, ऑटो हब, ओसवाल किरण बिल्डींग, ओम साई पेट्रोलपंप समोर, मिरा भाईंदर रोड, भाईंदर पूर्व ता. जि. ठाणे याने केले असल्याचे निष्पन्न झाले असुन आरोपी हा फिरस्ता असल्याने त्याचा गोपनिय बातमीदारामार्फत शोध घेवुन त्यास अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीला मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालय ठाणे यांचे कडुन पोलीस कस्टडी घेवुन त्याचे कडुन तपास करुन मिरारोड पोलीस ठाणेत दाखल असलेल्या वरील नमुद दोन्ही गुन्हयातील चोरी केलेल्या मोटर सायकल हस्तगत करुन गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
अटक आरोपी अल्ताफअली युनुस खान हा सन २००८ पासुन चोरी व जबरी चोरीच्या गुन्हयातील सराईत आरोपी असुन त्याच्यावर यापुर्वी मिरारोड तसेच मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यात १३ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी श्री. प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१, मिरारोड पुर्व, डॉ. श्री. विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.चंद्रकांत सरोदे, पोलीस निरीक्षक श्री. मिलिंद साबळे (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि संतोष सांगवीकर, पोउपनि/किरण वंजारी, पोहवा प्रफुल्ल महाकुलकर, बालाजी हरणे, परेश पाटील, संदीप गिरमे, पो.अमं. शंकर शेळके, अथर्व देवरे, चंद्रदीप दासरे यांनी केलेली आहे.
