भाईंदर – रिक्षा चोराला अटक करुन ८ गुन्हांची उकल- नवघर पोलीस ठाणे ची कामगीरी. मिळालेल्या माहीती नुसार अभिमन्यु काशिराम कनोजीया वय ४० वर्षे रा.रुम नं जी- १०, उ वींग, साई सम्राट सोसायटी, नवघर रोड, भाईंदर पूर्व हे रिक्षा चालक असुन ते MH-04- GN-6751 ही चालवतात. दि. १८/०३/२०२४ रोजी दिवसभर रिक्षा फिरवुन रात्री – १०.३० वा. च्या सुमारास आशीष बार समोर रोडवर,नवघर फाटक रोड, भाईंदर पूर्व येथे त्यांनी आपली रीक्षा पार्क केली. न ते आपल्या घरी निघुन गेले. दुस-या दिवशी दि.१९/०३/२०२४ रोजी सकाळी – ०७.३० वा अभिमन्यु काशिराम कनोजीया पुन्हा रिक्षा चालवण्यासाठी त्यांची रिक्षा घेण्यासाठी घटनास्थळावर गेले असता त्यांची रिक्षा त्यांना पार्क केलेल्या ठिकाणी आढळुन आली नाही. त्यावेळी त्यांनी त्यांच्या रिक्षाचा त्या परिसरात शोध घेतला मात्र त्यांची रिक्षा त्यांना कोठेही मिळुन आली नाही. त्यानंतर त्यांची आपली रिक्षा चोरी झाल्याबाबत खात्री झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात येवुन तक्रार दिल्याने दि. १९.०३.२०२४ रोजी नवघर पोलीस ठाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
नवघर पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसांपासुन वारंवार रिक्षा चोरीचे गुन्हे होत होते. सदरची बाब ही गंभीर असल्याचे लक्षात घेवुन मा. पोलीस उप-आयुक्त सो. परिमंडळ-०१, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सो. नवघर विभाग तसेच मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. नवघर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या सुचना, तसेच मागील काही दिवसांपासुन पोलीस ठाणे हददीतुन चोरी गेलेल्या रिक्षा चोरीच्या गुन्हयांचा तपासा दरम्यान प्राप्त केलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज, तसेच वर नमुद गुन्हयातील घटनास्थळावरुन व घटनास्थळाचे आजुबाजुवरुन प्राप्त केलेले सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज यांची एकत्रित पडताळणी केली असता पोलीसांनी गुन्हयातील संशयित आरोपी हा वारंवार येवुन रिक्षा चोरीचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अधिक तपास केला असता गुन्हयातील आरोपी हा चोरी करण्यासाठी बोरीवली, मुंबई येथुन आले असल्याचे समजले होते. त्याप्रमाणे नमुद संशईत आरोपी याचा सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आय.सी कॉलनी बोरीवली पश्चिम परिसरात शोध घेतला असता शशीकांत मल्लेश कामनोर वय ३२ वर्षे, व्यवसाय- रिक्षाचालक,रा.लींक रोड फुटपाथवर मंडपेश्वर मेट्रोस्टेशनच्या बाजुला, बोरीवली पश्चिम, मुंबई मुळगाव गंजीखेड, जि.गुलबर्गा, कर्नाटक हा मिळुन आला होता. नमुद आरोपी यास पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याचा सदर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दि. १९/०३/२०२४ रोजी अटक करण्यात आली होती. आरोपी याचाकडे पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या तपासात त्याचाकडुन एम. एच. बी. कॉलनी पोलीस ठाणे मुंबई तसेच नवघर पोलीस ठाणे अशा वेगवेगळया ठिकाणाहुन चोरी केलेल्या एकुन – ०७ ऑटो रिक्षा अशी एकुन रुपये – ७,६९,०००/- किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे. तसेच तपासा दरम्यान नवघर पोलीस ठाणे तसेच एम. एच. बी. कॉलनी पोलीस ठाणे मुंबई येथील रिक्षाचोरीचे एकुन – ०८ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सदर गुन्हयातील आरोपी याच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी श्री. मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मि. भा-व. वि. पोलीस आयुक्तालय, श्री. श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त, श्री. प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०१, श्री. राजेंद्र मोकाशी सहा.पो.आयुक्त, नवघर विभाग यांचा मार्गदर्शनाखाली धिरज कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) अशोक कांबळे, सपोनि संदिप पालवे, पोउनि – ज्ञानेश्वर आसबे, सफौ/गौतम तोत्रे, पोह- भुषण पाटील, संतोष पाटील, पोह-सुरेश चव्हाण, पोह- नवनाथ घुगे, पोशि- ओंकार यादव, पोशि – सुरजसिंग घुनावत पोशि – अस्वर, पोशि – पवार तसेच मसुब/कुणाल हिवाळे यांनी केलेली आहे.
