गुगल रिव्हिव च्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक झालेली पूर्ण रक्कम परत करण्यास पोलिस झाले यशस्वी.

Crime News Cyber Crime Latest News Political News ताज्या घडामोडी

भाईंदर(प.)(दि.१३)- गुगल रिव्हीव शेअर करण्याचे टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली ऑनलाईन गुंतवणुक करण्यास सांगुन केलेल्या फसवणुकीतील १०० टक्के रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात उत्तन सागरी पोलीस ठाणे यांना यश. मिळालेल्या माहीतीनुसार गिफ्टसन विजय माल्या, वय.२८ वर्षे, व्यवसाय नोकरी रा. विभाग क्र.०६, जुनी बालवाडी शाळेजवळ, चौकगाव, उत्तन, भाईंदर (प.), ता.जि.ठाणे,मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे यांना wendy_chapman_ या इंस्टाग्राम अकाउंट तसेच 8801307349023 या मोबाईल नंबर वरून वर्क फ्रॉम होम ची माहिती देवून त्यांनी दिलेल्या टास्कमधील कंपनी व रेस्टॉरंटचे गुगल रिव्हीवचे स्क्रीनशॉट पाठविण्याचे टास्क देवून त्याबदल्यात मोठा रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवणुक करण्यास सांगितले व  त्यांची रु. ३,८४,०००/- रूपये रकमेची फसवणुक केली. या फसवणुकीच्या अनुषंगाने पोलीस ठाणे उत्तन सागरी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयात एकापेक्षा जास्त पिडीत समाविष्ट होते.

गुन्हयाचा तपास करीत असतांना आरोपींनी फिर्यादी / पिडीत यांची रक्कम स्विकारण्यासाठी तसेच ती रक्कम वेगवेगळया बँक अकाउंटमध्ये वळती करण्यासाठी वापर केलेले अनेक बँक अकाउंट पोलिसांनी निष्पन्न केले. त्यामुळे तक्रारदार यांचे पैसे परत मिळविण्याकरिता सदरच्या बँक अकाउंटमधील रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर मा. न्यायालयाकडून तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरिता उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी/अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार गिफ्टसन माल्या यांची फसवणुक झालेली रू. ३,८४,०००/- ही रक्कम त्यांच्या बँक खात्यावर परत मिळविण्यात आलेली आहे. त्यावर तक्रारदार गिफ्टसन माल्या यांनी पोलिस पथकास पुढीलप्रमाणे प्रतिक्रीया दिलेली आहे- “काल संध्याकाळी माझी फसवणुक झालेली रक्कम माझे बँक खात्यावर क्रेडीट झालेली आहे. Thank You Sir… मी तुमचा माझ्या आयुष्यात खुप ऋणी राहीन.”

अशा प्रकारची ऑनलाईन फसवणुक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी… Telegram Channel, Facebook, Instagram अथवा WhatsApp वर जास्त परतावा देणाऱ्या Promotional Adds वर विश्वास ठेवु नका. याव्दारे आपली फसवणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये Telegram Channel, WhatsApp Group वर Adds करून तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे Screenshots, Messages दाखवून पैसे गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले जाते. गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही लोकांचे बँक स्टेटमेंटमध्ये त्यांना फायदा झालेची रक्कम दाखवून फसवणुक करण्यात येते.एकदा गुंतवणुकदारांचा विश्वास जिंकला की, हे लोक गुंतवणुकदारांना जास्त व खात्रीशीर परताव्याची हमी देतात. अशा गुंतवणुकीमध्ये आर्थिक फसवणुक होण्याचा धोका मोठया प्रमाणात असतो.

Work From Home नावाखाली Online Youtube Videi Link Task, Hotel / Movie Rating या सारख्या गुंतवणुक करणाऱ्या फसव्या जाहीरातींना बळी पडु नये.

> जास्त परतावा देण्याचे आमिष दाखविणाऱ्या कोणत्याही ट्रेडींग अॅपवर विश्वास ठेवू नये तथा ट्रेडींगॲपची विश्वासार्हता तपासून पाहीलेशिवाय गुंतवणुक करू नये. कोणतेही अनधिकृत अॅप्लीकेशन डाउनलोड करू नये अथवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.

ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ आपले बँकेला संपर्क करावा.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामधील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपणांसोबत कोणत्याही प्रकारची ऑनलाईन फसवणुक झाल्यास आपण नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर पोलीस स्टेशन यांना संपर्क करावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधुन तात्काळ आपली तक्रार नोंद करावी.

सदरची कामगिरी श्री. प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, परि. क्र. ०१ मिरारोड, श्रीमती.दीपाली खन्ना, सहा. पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे. उत्तन सागरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. दादाराम करांडे, श्री. ऋषिकेश पवळ, पोलीस निरिक्षक (गुन्हे), पोहवा / ९६०४२ राजाराम आसवले, पोहवा / ०६२२५ दिलीप सनेर यांनी पार पाडली आहे.

सायबर फसवणुक हेल्पलाईन क्रमांक – १९३०

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.