ऑन लाईन यु-ट्युब मार्फत,वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली वेगवेगळ्या व्यवसायातून फसवणूक झालेली सुमारे ४,३०,३००/- रक्कम पोलिसांनी केली परत.

Crime News Cyber Crime Latest News Political News ताज्या घडामोडी

काशिमीरा – वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ऑनलाईन यु-ट्युब व्हिडीओ लाईक स्टास्क, ऑनलाईन हॉटेल / मुव्ही रेटींगमध्ये गुतंवणुक करण्यास सांगुन केलेल्या फसवणुकीतील रक्कम ४,३०,३००/- रुपये पैकी १,५०,०००/- रुपये तक्रारदार यांना परत करण्यात काशिमीरा पोलीस ठाण्यास यश.अधिक माहीतीनुसार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पोलीस स्टेशन परीसरात राहणारे श्री.बलंवतराय रामजीभाई सुरती, वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ऑनलाईन यु-ट्युब व्हीडीओ लाईक स्टास्क, ऑनलाईन हॉटेल/मुव्ही रेटींग यांना लाईक अथवा गुंतवणुक केल्यास अधिक नफा मिळविण्यामचे आमिष दाखवुन बलंवतराय रामजीभाई सुरती यांना ४,३०,३००/- रुपयाची फसवणुक झाली होती. सदर फसवणुकीच्या अनुषंगाने काशिमीरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

या तक्रारी बाबत तात्काळ गुन्हा दाखल करुन घेवून तक्रारदार यांचे झालेल्या  व्यवहाराबाबत पोलीसांनी माहिती प्राप्त केली. त्या माहितीचे अवलोकन करुन तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळया बँक खात्यात वळती झाल्याचे दिसुन आले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बँकेसोबत पत्रव्यवहार करून संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर मा. न्यायालयाकडुन तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्या करीता काशिमीरा पोलीस ठाणेचे अधिकारी / अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने साक्षीदार यांची फसवणुक झालेली रक्कमेपैकी १,५०,००० /- रुपये त्यांच्या खात्यावर परत मिळविण्यात आली आहे.

अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…

-Telegram Channel, facebook, Instagram अथवा Watsapp वर जास्त परतावा देणा-या Promotional Adds वर विश्वास ठेवु नका. याद्वारे आपली आर्थिक फसवणुक होण्याची शक्यता आहे.

– अश्या प्रकारच्या फसवणुकीमध्ये Telegram Channel, Watsapp Group वर अॅड करुन तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे Sceenshot, Massages दाखवुन पैसे गुंतवणुक करण्यास प्रवृत केले जाते. गुंतवणुक दारांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही लोकांचे बॅक स्टेटमेंट मध्ये त्यांना फायदा झालेली रक्क्म दाखवुन फसवणुक करण्यात येते. एकदा गुंतवणुक दारांचा विश्वास जिंकला की, हे लोक गुंतवणुक दारांना जास्त व खात्रिशिर परताव्याची हमी देतात. अशा गुंतवणुकीमध्ये आर्थिक फसवणुक होण्याचा धोका मोठया प्रमाणात असतो.

Work From Home नावाखाली Online You Tube Video Like Tasks, Hotel / Movie Rating या सारखा गुंतवणुक करण्या-या बनावट जाहिरातींना बळी पडू नये.

– कोणतेही अनाधिकृत एप्लिकेशन डाऊनलोड करुनये अथवा अनोळखी लिंक वर क्लिक करु नये.

– ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्या सोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.

सदरची कामगिरी श्री. प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परि ०१, मिरारोड, श्री. विजय कुमार मराठे, सहा.पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक श्री. राहुल सोनवणे, पोउपनि वैभव धनावडे, पोहवा / ०६२०६ दिनेश आहेर यांनी पार पाडली आहे. सायबर फसवणुक हेल्पलाईन क्रमांक – १९३०

सायबर फसवणुक हेल्पलाईन वेबसाईहट – www.cybercrime.gov.in

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.