काशिमीरा – खुनाच्या गुन्हयामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना पॅरोल रजेवरुन २०१७ पासुन पळुन गेलेल्या आरोपीतास ७ वर्षांनी अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष-१, काशिमीरा यांना यश. अधिक माहीतीनुसार काशिमीरा पोलीस ठाणे येथील दाखल गुन्ह्या मध्ये मा. ठाणे न्यायालयाने आरोपी यकीनअली नासीरअली शेख वय ३६ वर्षे, रा. गौरव संकल्प फेज ४, रुम नं. ४०२, रवी गृप, मिरारोड पुर्व ता.जि. ठाणे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सदर आरोपी हा कळंबा मध्यवर्ती कारागृह कोल्हापुर येथे शिक्षा भोगत असताना तो सन २०१७ मध्ये अभिवचन रजेवर सुटलेला होता. अभिवचन रजा संपल्यानंतर दिनांक १८/०२/२०१७ रोजी ५.०० वाजता कळंबा कारागृह, कोल्हापुर येथे रजेवरुन हजर होणे असतांना देखील तो कोल्हापुर कळंबा कारागृहात हजर न होता पळुन गेलेला होता. त्याच्या विरुध्द पो. शि. राजु नारायण शिंदे नेमणुक कळंबा कारागृह जिल्हा कोल्हापुर यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
मा. पोलीस आयुक्त सो, मा अपर पोलीस आयुक्त सो व मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) साो यांनी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात क्षेत्रात गुन्हयातील पाहीजे व फरारी आरोपीचा शोध घेवुन अटक करण्याबाबत आदेश दिले होते. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष ०१, काशिमिरा मार्फत तपास करीत असताना पो. हवा. पुष्पेंद्र थापा यांना मिळालेल्या माहीतीप्रमाणे तपास करण्यात आला.
सदर गुन्हयांतील फरारी आरोपी यकीनअली नासीरअली शेख याची माहीती काढुन त्याचा शोध घेत असताना सदर आरोपी दिनांक ०७/०३/२०२४ रोजी मिळुन आलेला असुन त्यास त्याचे नांव विचारता त्याने आपले नांव यकीनअली नासीरअली शेख वय ४६ वर्षे, सध्या रा. सन क्लब बिल्डींग, ए विंग, रुम नं. १०८, सफारी हॉटेलच्या मागे, काशिगांव, ता. जि. ठाणे. मुळ रा. राजेश कम्पौंड नाशिर अलि चाळ, रुम नं. ०१, दहिसर पूर्व, मुंबई असे सांगीतले आहे.आरोपी यास ताब्यात घेवुन त्यास पुढील कायदेशीर कारवाई साठी काशिमीरा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मा. श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त सो, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा येथील पो.निरी अविराज कुराडे, सपोनिरी कैलास टोकले. सपोनिरी प्रशांत गांगुर्डे, सपोनिरी पुष्पराज सुर्वे, सफौ संदीप शिंदे, पोहवा/ संतोष लांडगे, पोहवा / पुष्पेंद्र थापा, पो. हवा. / सचिन हुले, पोहवा/ सचिन सावंत, पो. हवा. /विजय गायकवाड, पो. हवा / समिर यादव, पो.हवा/ सुधीर खोत, पो. कॉ./ प्रशांत विसपुते, पो. कॉ./ सनी सुर्यवंशी, १) पोशि/गौरव बारी २ ) पोशि/ सौरभ इंगळे, मसुब / किरण आसवले, सफौज. सो चव्हाण सायबर विभाग यांनी केली आहे.
