काशिमिरा – काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगार हद्दपार. अधिकमाहीती नुसार काशिमिरा पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आरोपी विशाल रमेश राजभर वय-२० वर्षे याच्या विरोधात मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय तसेच गुजरात राज्यातील वलसाड येथे जबरी चोरी, चोरी, फसवणूक व दुखापतीचे असे दखलपात्र – १८ व अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत.त्याचप्रमाणे काशिमिरा पोलीस ठाणे हददीत राहणारा सराईत गुन्हेगार आरोपी मनोज भुजारत चव्हाण वय-३८ वर्षे याच्या विरोधात देखील काशिमिरा पोलीस ठाणे येथे मालमत्ता व शरीराविरुध्दचे असे एकूण – १० दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत.
वरील दोन्ही आरोपी यांच्याविरुध्द प्रतिबंधक कारवाई करून देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा न होता ते वारंवार गुन्हे करीत असल्याने व त्याच्याबद्दल जनतेच्या मनात असुरक्षीततेची भावना निर्माण झाल्याने त्यांना काशिमिरा पोलीस ठाणे व आजुबाजूचे परिसरातून हददपार करणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने सदर आरोपी यांचावर हददपारीची कारवाई करणे आवश्यक होते त्याबाबतचा अहवाल मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०१, मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांना पाठविण्यात आला होता. त्यानुसार मा.पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ-०१, मिरारोड – पुर्व यांनी आरोपी १) विशाल रमेश राजभर वय – २० वर्षे यास दि. २६/०२/२०२४ रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्हयातून २ वर्षाकरीता हददपार करण्यात आलेले आहे. तसेच आरोपी २) मनोज भुजारत चव्हाण वय – ३८ वर्षे यास दि.२९/०२/२०२४ रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्हयातून २ वर्षाकरीता हददपार करण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी श्री. मधुकर पांडे, पोलीस आयुक्त, मि. भा-व. वि पोलीस आयुक्तालय, श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०१, विजयकुमार मराठे, सहा.पो.आयुक्त, मिरारोड विभाग, पोलीस निरीक्षक / कुमारगौरव धादवड, सध्या नेम- पेल्हार पोलीस ठाणे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि / योगेश काळे, पोउनि / शिवाजी खाडे, सपोउनि – अजय मांडोळे, पो. हवा. / मधुकर सावंत, पोह- /सचिन पाटील, पोशि -/ प्रदिप काटकर, पोशि -/ प्रविण टोबरे, पोशि -/ रवींद्र कांबळे यांनी कामकाज केले आहे.
