मिरारोड – चोरीच्या गुन्हयातील सराईत आरोपीतास अटक मिरारोड पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगीरी. मिळालेल्या माहीती नुसार मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणा-या श्रीमती प्रिती चंद्रकांत कारेकर वय ४४ वर्षे रा.बी/३१/२०२ प्लाझा विहार, शांतीपार्क, शिवाली गार्डन रेस्टॉरंट आणि बार मिरारोड पुर्व ता.जि.ठाणे यांच्या मालकीची टाटा एस (छोटा हत्ती ) हा शिवाली गार्डन रेस्टॉरंट आणि बार येथे बिल्डींगच्या बाहेर सार्वजनिक रोडवर उभा असतांना आरोपी यांने टेम्पो मधील ०३ बॅट-या, एक स्टीलचा कपाट असा एकुण ९७,०००/- रु किमतीचा मुद्देमाल चोरी करुन नेला याबाबत फिर्याद यांनी दिनांक ०१/०३/२०२४ दिलेल्या तक्रारीवरुन मिरारोड पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद गुन्हा हा अनोळखी आरोपीने केला असल्याने तो उघड होण्याकरीता मा. वरीष्ठांना गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवुन गोपनिय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहिती च्या आधारे , सदरचा गुन्हा हा मिरा भाईंदर परिसरातील चोरी व घरफोडी चे गुन्हे करणारा सराईत आरोपी आरबाज ईस्माईल शाह वय.२४ वर्षे, रा. मकसुद चाळ, मुन्शी कंम्पाउड, काशिमिरा, मिरारोड पुर्व ता. जि. ठाणे याने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमुद आरोपीचा शोध घेवुन त्यास अटक करण्यात आली असुन गुन्हयात चोरी केलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी याच्यावर आयुक्तालयातील अभिलेखावर यापुर्वी एकुण ६ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी श्री.प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१, मिरारोड पुर्व, डॉ. श्री. विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत सरोदे, पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पाटील (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि / संतोष सांगवीकर, पोउपनि / किरण वंजारी, पोहवा / प्रफुल्ल महाकुलकर, बालाजी हरणे, परेश पाटील, पो. अमं. शंकर शेळके, अथर्व देवरे यांनी केलेली आहे.
