मिरा-भाईंदर : राष्ट्रीय महामार्ग ४८ वर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीकरीता मा. खासदार राजेंद्र गावीत, मा.पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा काशिमीरा, वसई व विरार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, मिरा भाईंदर व वसई विरार माहनगरपालिकेचे प्रतिनीधी, आरटीओ अधिकारी, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महामार्गाचे काम करणारे ठेकेदार तसेच मिरा भाईदर व वसई विरार आयुक्तालयातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले –
१. राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाचे व्हाईट टोपिंगचे काम करणा-या कंत्राटदाराला पोलीस निरीक्षक, वसई वाहतूक विभाग यांनी सूचविलेल्या ठिकाणी मजबूत बॅरीकेटींग करुन घ्यावे.
२. महामार्गवरील सर्विस रोडवरील खड्डे प्राधान्याने दुरूस्त करणे, बेकायदा पार्कींग केलेली वाहने हटविणे व महामार्ग प्राधिकरणाच्या जमीनीवरील अतिक्रमण हटविणे इत्यादी कार्यवाही एन. एच.ए.आय. च्या अधिकाऱ्यांनी त्वरीत सुरू करावी.
३. महामार्गावरील खानीवडे टोलनाका ते घोडबंदर या वाहिनीवर व्हाईट टोपिंगचे काम सूरू असतांना वाहतुकीचे नियोजन करण्याकरीता सुमारे १२० वार्डन भारतीय एन. एच. ए.आय. यांचे कंत्राटदार यांनी वाहतुक पोलीसांच्या सूचनेप्रमाणे कर्तव्यावर नेमावे.
४. महामार्गावरील काम एकाच वेळी अनेक ठिकाणी सुरु न करता एक किंवा दोन ठिकाणी कामे पुर्ण करुन त्यानंतर सलग काम करण्याबाबत एन. एच. ए.आय.च्या अधिकाऱ्यांनी सूचना दयाव्यात.
५. महामार्गावरील डेब्रिज इतरत्र हलविण्याकरीता सबंधित महानगरपालिका क्षेत्रामध्ये जागा महानगरपालीका आयुक्तांनी उपलब्ध करुन दयावी व महामार्ग प्राधिकरणाने त्वरीत महामार्गावरील संबंधित ठिकाणी हलवावे.
६. महामार्गावरील ब्लॅक स्पॉट च्या ठिकणी ओव्हर ब्रिज किंवा अंडर पास बनविण्याबाबत तसेच त्याबाबत अन्य उपाययोजना करणेबाबत सुचना करण्यात आल्या.
७. एन.एच.ए.आय. ने त्यांचे कंत्राटदार कडून महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी दुभाजकास नव्याने कट करण्यात आले आहेत ते ते कट कायमस्वरुपी बंद करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. तसेच आवश्यक ठिकाणी बॅरिकेटिंग करण्याबाबतच्या सुचना दिल्या.
