भांईदर – घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीनां अटक करुन ३ गुन्हांची उकल नवघर पोलीस ठाणेची कामगीरी.अधिक माहीतीनुसार राहुल मुक्तीनारायन पाठक, वय-५४ वर्षे, व्यवसाय- व्यापार, रा. रुम नंबर १०२, ए विंग, आशाकिरण बिल्डींग, विमल डेरी रोड, नवघर, भांईदर पुर्व, ता.जि.ठाणे यांच्या शॉप नं १३, माताजी मसाला बाजार, विमल डेरी जवळ भाईंदर पूर्व या बंद दुकाणाचे कुलुप तोडुन शटर उचकटुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने दिनांक २७/०१/२०२४ ते २८/०१/२०२४ च्या दरम्यान रुपये ४,९००/- रोख रक्कम तसेच ०५ काजु पॉकेट असा मुद्देमाल रात्रौ घरफोडी चोरी केली याबाबत त्यांनी नवघर पोलीस ठाणे येथे येवुन तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नवघर पोलीस ठाणे यांनी सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने त्याची माहीती मा. वरिष्ठांना देवुन त्यांचा मार्गदर्शनाप्रमाणे नमुद गुन्हयाचा तपास सुरु केला व प्रथम गुन्हयाच्या घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तांत्रिक तपास करुन आरोपी १) जयसींग दत्तु राठोड, वय-२० वर्षे, व्यवसाय-व्यापार, रा.जी -१५,गल्ली नं ८, सिध्दीवीनायक चाळ, नेहरू नगर, भाईंदर पश्चिम, जि. ठाणे तसेच २) सुरज मोतलाल त्रीपाठी, वय-२२ वर्षे, व्यवसाय – नोकरी, रा. जी – १०, गुप्ता गल्ली, नेहरू नगर, भाईंदर पश्चिम,जि.ठाणे यांना भाईंदर पश्चिम येथुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता सदर गुन्हा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना नमुद गुन्हयात दि. २९/०१/२०२४ रोजी अटक करण्यात आली होती. अटक आरोपी यांना मा.न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने अटक आरोपी यांची दि.०१/०२/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली होती. अटक आरोपी यांचाकडे पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या तपासात नवघर पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकुण ०३ गुन्हे उघडकीस आलेले आहे. तसेच आरोपी यांचा ताब्यातुन एकुण ३१,४००/- रुपये किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी श्री. मधुकर पांण्डेय, पोलीस आयुक्त, मि. भा-व. वि. पोलीस आयुक्तालय, श्री. श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त, श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, श्री. उमेश माने-पाटील, सहा.पो.आयुक्त, नवघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली धिरज कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, स. पो. नि. संदिप पालवे, विशाल धायगुडे, पो.उप निरी. ज्ञानेश्वर आसबे, पो. हवा. संतोष पाटील, भुषण पाटील, सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, पो. अं. ओंकार यादव, सुरजसिंग घुनावत तसेच यांनी केलेली आहे.
