भाईंदर (प ) : Axis Bank मधुन बोलत असल्याचे सांगून फसवणुक- ३,५६,०००/- रु.रक्कम परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश . अधिकमाहितीनुसार, मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील उत्तन परिसरातील महिला जेनीफर पाटील यांना मोबाईलवर एक्सीस बँकेमधून बोलत असल्याचे सांगुन त्यांच्याकडून बँकेची सर्व माहिती प्राप्त करून घेतली. व जेनीफर पाटील यांना एनिडेक्स ॲप डाऊनलोड करण्यात सांगून त्याचा एक्सेस घेण्यात आला. त्यानुसार तक्रारदार यांची नावे असलेली एफडी विड्रॉवल करून रक्कम तक्रारदार यांचे खात्यावर मुळ खात्यावर घेवून पुढे वळती करण्यात आली याबाबत बाबत तक्रार सायबर पोलीस ठाणे येथे दिनांक १६/१२/२०२३ नमूद करण्यात आली होती.
नमूद तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांच्या झालेल्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे फसवणूक रक्कमेबाबत Jio Payment Bank / Axis Bank यांना तात्काळ पत्रव्यवहार व पाठपूरावा करुन नमूद फसवणूक रक्कम थांबविण्यात आली व पुन्हा तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली. तसेच उर्वरीत रक्कम ज्या बँक खात्यावर वळती झालेली आहे. त्या बँक खात्याबाबत माहिती प्राप्त करण्यात आली आहे अधिक तपास सुरु आहे.
अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…
- बँकेकडून बँक खातेधारकाला कोणतीही वैयक्तीक माहिती विचारली जात नाही.
- Bank Debit Card Number, CVV, Pin, OTP etc.. संदर्भातील माहिती कोणाकडेही उघड करू नये • आपले बँक खाते, जन्मदिनांक, OTP वा इतर वैयक्तीक माहीती देवू नये.
- फसव्या एमएसएसला, कॉल प्रतिसाद देवू नका.
- आपल्या मोबाईलमध्ये रिमोट एक्सेस अॅप्लीकेशन डाऊनलोड करून कोणताही नंबर देवू नये अथवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
- क्रेडीट कार्ड, डेबिट कार्डद्वारे फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.
सदरची कामगिरी श्री.अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुजितकुमार गुंजकर, सपोनि / स्वप्नील वाव्हळ, पोउपनिरी/ प्रसाद शेनोळकर, मपोअं/ १३०८७ अमिना पठाण, मपोअं/ १६१०६ सुवर्णा माळी, पोअं/२२००३ कुणाल सावळे यांनी पार पाडली आहे.
सायबर पोलीस ठाणे व्हॉट्सऍप हेल्पलाईन क्रमांक :- ९०० ४८८०१३५
सायबर पोलीस ठाणे ई-मेल आयडी :- cybercrime.mb-vv@mahapolice.gov.in
