भाईंदर : भारतामध्ये अवैध पणे वास्तव्य करणा-या २ बांगलादेशी महिलांवर कारवाई करण्यात नवघर पोलीस ठाण्यास यश. अधिकमाहितीनुसार नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या भारतात प्रवेश करुन राहणारे २ बांग्लादेशी नागरीक नवघर नाका हनुमान मंदीरा जवळ येणार असल्याची माहीती पो.उप निरी. माळोदे यांना त्यांच्या खास बातमिदारामार्फत माहीती मिळाली. त्यावर नवघर नाका हनुमान मंदीरा जवळ येथे सापळा रचुन २ बांग्लादेशी इसमावर कारवाई करण्यात नवघर पोलीस ठाणे यांना यश मिळाले आहे.
सदर बाबत थोडक्यात हकीकत अशी कि,नवघर पोलिसांनी सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन कोहीनुरबेगम रोजगुल इस्लाम सघर वय – ५८ वर्षे, व्यावसाय- घराकाम, राहणार – इंदीरा नगर झोपडपट्टी, मुळ गांव बाफेरवाडी, ता. हाजीपुर, जिल्हा – सत्कीरा, राज्य खुलना, देश बांगलादेश व अनुअराबेगम अन्सरअली तोफादर, वय – ६०वर्षे, व्यावसाय- घराकाम, रा. इंदीरा नगर झोपडपट्टी, मुळ गांव बाफेरवाडी, ता. हाजीपुर, जिल्हा – सत्कीरा, राज्य खुलना, देश बांगलादेश या दोन बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेतले व त्यांना त्यांचे भारतीय नागरीकत्वाचे कागदपत्र सादर करण्यास सांगितले असता त्यांनी त्याचे कोणतेच कागदपत्र सादर केले नसुन ते मुळ बांग्लादेशी देशाचे असल्याचे त्यांनी सांगितले. वरील दोन्ही आरोपी हे बांग्लादेश या देशाचे नागरीक असुन ते अनधिकृतपणे पश्चिम बंगाल मार्गे भारतात आलेले असल्याचे त्यांनी सांगितलेया वरून सदर आरोपींच्या विरुध्द नवघर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ श्री जयंत बजबळे, सहायक पोलीस आयुक्त नवघर विभाग श्री. उमेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय पवार, पो.नि.सुशीलकुमार शिंदे, स.पो.नि. विशाल धायगुडे, पो.उप निरी. तुषार माळोदे, पो. हवा. जावळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
