मिरारोड – सराईत घरफोडी करणारे आरोपीस अटक करून गुन्हयातील ८,०६,०००/- रु.चे सोने / चांदीचे दागीने व रोख मालमत्ता हस्तगत करण्यात काशिमिरा पोलीस ठाणेस यश. सविस्तर माहीती अशी की, प्लेझंटपार्क, काशिमिरा, मिरारोड- पुर्व, ठाणे येथे राहणारे वैभव गोपाळ आव्हाड वय – ३२ वर्षे, धंदा – नोकरी यांनी पोलीस ठाणेस येवून कळविले की, ते त्यांचा कुटुंबासोबत दि.०८/१२/२०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास गोराई बीच येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते रात्री घरी परत आले तेव्हा त्यांना त्यांचा घराचे मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा तुटलेले दिसले तसेच दरवाजास लावलेले लॉक देखील मिळुन आले नाही. तेव्हा त्यांनी घरामध्ये जावुन पाहीले असता त्यांना बेडरुममध्ये असलेल्या तिजोरीचे लॉक तुटलेले व दरवाजा अर्धवट उघडा दिसला व कपाटातील सामान देखील आस्ताव्यस्त पडलेले दिसुन आले. त्यानंतर त्यांनी तिजोरीतील त्याचे सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच इतर मालमत्ता मिळुन रुपये – ८,०६,०००/- किंमतीची मालमत्ता मिळुन आली नाही. यावरुन त्यांची खात्री झाली की, त्यांचा घरामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केली असुन त्याबाबत त्यांनी पोलीस ठाणेस येवुन तक्रार दिल्याने काशिमिरा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
घरफोडी चोरीचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलिस पथकाने तात्काळ तपास सुरु केला असता, तपासादरम्यान गुन्हयाच्या घटनास्थळी पोलिसांनी भेट देवून घटनास्थळ तसेच घटनास्थळाच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज तपासले असता त्यामध्ये एक संशईत इसम हा घटनास्थळावर येताना व जाताना दिसुन आला. सदर फुटेजच्या आधारे नमुद गुन्हयाचा तपास सुरु करुन तसेच पोलीस ठाणे अभिलेखावरील घरफोडी चोरी करणारे आरोपी यांचे फोटो तपासले असता त्यामध्ये घटनास्थवरील फुटेज हे रेकॉर्डवरील आरोपी शमीम मोहम्मद हारुन शहा वय २३ वर्षे रा-मुन्शी कंपाउंड, काशिमिरा, मिरारोड – पुर्व, ठाणे याच्याशी मिळते जुळते असल्याचे आढळून आले. त्यानुसार सदर आरोपी याचा पोलीस ठाणे हददीत शोध घेतला असता त्यास मुन्शी कंपाउंड येथून ताब्यात त्याचाकडे तपास केला असता त्याने सदर गुन्हयात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचेकडे अधिक तपास केला असत सदर गुन्हात त्याचा भाऊ सलीम मोहम्मद हारुन शहा वय २५ वर्षे याचाकडे व त्याने त्यांची आई सैदुनिसा मोहम्मद हारुण शहा वय – ५० वर्षे यांचा सहभाग असल्याचे कबूल केले असून आरोपी १) शमीम मोहम्मद हारुन शहा, २) सलीम मोहम्मद हारुन शहा ३) सैदुनिसा मोहम्मद हारुण शहा यांचा सहभाग असल्याचे आढळून आल्याने सदर आरोपीस गुन्हयात दि.१०/१२/२०२३ रोजी व दि.१२/१२/२०२३ रोजी पोलिसांनी अटक केली असून नमुद आरोपी यांची दि.१५/१२/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर असून तपास चालू आहे. तपासा दरम्यान सदर आरोपी यांचेकडून नमुद गुन्हयातील चोरी गेलेली संपुर्ण मुद्देमाल रुपये- ८,०६,०००/- किंमतीचे सोने, चांदीचे दागीने व १०००/ रु. रोख अशी सर्व मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. सदर गुन्हयात अटक केलेला आरोपी शमीम मोहम्मद हारुन शहा वय-२३ वर्षे हा सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर काशिमिरा पोलीस ठाणे येथे चोरीचे ०३ गुन्हे दाखल आहेत नमुद गुन्हयाचा तपास सपोनि / योगेश काळे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री. जयंत बजबळे- पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०१, श्री. महेश तरडे, सहा.पो.आयुक्त, मिरारोड विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संदिप कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काशिमिरा पोलीस ठाणे, श्री. समीर शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे), स.पो.नि. योगेश काळे, पो.उप.निरी. शिवाजी खाडे, सहा.फौ. अनिल पवार, पो. हवा. दिपक वारे, प्रताप पाचुंदे, राहुल सोनकांबळे, निलेश शिंदे, निकम, पो.अं. रवी कांबळे, प्रविण टोबरे, किरण विरकर, राजेंद्र सुर्यवंशी यांनी केलेली आहे.
