दि. १७ भाईंदर :नवघर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या विविध गुन्हयातील १६,६०,०००/- रुपयांचा हस्तगत मुद्देमाल पिडीत व फिर्यादी यांना मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१ यांचे हस्ते परत करण्यात आला आहे.
आज दिनांक १७/०४/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजताच्या दरम्यान नवघर पोलीस ठाणे येथे घेण्यात आलेल्या मुद्देमला हस्तांतरण कार्यक्रमादरम्यान पिडीतांना उपरोक्त मुद्देमाल पोलीसांनी कायदेशीर बाबींची पुर्तता करुन परत मिळवून दिल्याने संबंधित पिडीत व फिर्यादी यांनी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीसांचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ – १ हद्दिमधील नवघर या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या २०२२ व २०२३ मधील विविध गुन्हयांतील हस्तगत केलेला एकुण १६,६०,०००/- रुपयांचा मुद्देमाल मा. पोलीस उप आयुक्त श्री. जयंत बजबळे, परिमंडळ १ यांच्या हस्ते आज दिनांक १७/०४/२०२३ रोजी पिडीत व फिर्यादी यांना परत करण्यात आला आहे. पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गंभीर तसेच चोरी व घरफोडीसारख्या गुन्हयांची पोलीसांनी कौशल्यपुर्वक उकल करुन फिर्यादी यांचा आरोपींनी चोरुन किंवा जबरीने नेलेल्या किंमती वस्तू तसेच रोख रक्कम, गहाळ झालेले मोबाईल हॅन्डसेट इत्यादी गुन्हयाचे तपासादरम्यान हस्तगत करण्यात आले होते. सदर गुन्हयांमध्ये पोलीसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये गहाळ झालेले विविध कंपनीचे ४१ मोबाईल हॅन्डसेट, ६ मोटर सायकल, १ रिक्षा, रोख रक्कमेचा समावेश आहे.
सदर मुद्देमला हस्तांतरण कार्यक्रमादरम्यान मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तलयाचे श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, नवघर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. विजय पवार, पो.नि. श्री. सुशीलकुमार शिंदे (गुन्हे), पो. नि. श्री. प्रकाश मासाळ (प्रशा.), स.पो.नि. श्री. योगेश काळे, पो.उप.नि. श्री. अभिजीत लांडे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील इतर अंमलदार व नागरिक उपस्थित होते.
