मिरारोड : मिरारोड गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोरी व जबरी चोरी करणा-या सराईत आरोपीस अटक करुन ९ गुन्हांची उलघडा केला आहे. अधिक माहितीनुसार मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणारे हेमंत गोपाळ गिजे, राह. रुम नं. ५०४ बि.नं. ३, साई एन्क्लेव्ह, साई कमल को ऑप हौसिंग सोसा, वागडनगर रोड, रामदेव पार्क, मिरारोड पुर्व हे दिनांक ३०/०७/२०२३ रोजी सायंकाळी ०४.४० वाजता त्यांची पत्नी भाविका व मुलगा ध्रुव यांच्या बरोबर रिक्षाने मिरा भाईंदर रोडने काशिमिरा बाजुकडे प्रवास करत असतांना एस.के. स्टोन येथील कुसुम रोल्सजवळील सिग्नलच्या पुढे बस स्टॉपसमोर आल्यावेळी रिक्षाचे पाठीमागुन दोन अनोळखी इसम मोटर सायकलवरुन येवुन हेमंत गिजे याची पत्नी भाविका यांची हॅण्ड बॅग जबरदस्तीने हिसकावुन पळवुन घेवुन गेले म्हणुन त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मिरारोड पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेवुन वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी आरोपी शोएब हनिफ खान सरगुरु वय ३७ वर्षे रा. रुम नं.२०२, अब्दुला अपार्टमेंट, दुसरा माळा, राशीद कम्पाऊंड, मुंब्रा कौसा, ता. जि. ठाणे, मुळ रा.ए/१०३, नुरजहान पॅलेस, रशिद कम्पाऊंड, श्रीलंका, कौसा, मुंब्रा, ठाणे यास ताब्यात घेवुन तपास केला असता त्याने वर नमुद गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्हात अटक करण्यात आली . अटक आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याच्या कडुन चोरी व जबरी चोरी केलेले एकुण ७ मोबाईल, १ चाकु व १ गुन्हयात वापरलेल्या मोटर सायकलचे आर.सी बुक तसेच रोख रक्कम हस्तगत करुन मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील २ गुन्हे व ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील ७ गुन्हे, असे एकुण ९ गुन्हे उघड करण्यात आलेले आहे. सदर गुन्हयाचा तपास मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो.उप.नि.किरण वंजारी हे करीत आहेत.
अटक आरोपी शोएब हनिफ खान सरगुरु हा सन २००८ पासुन चोरी व जबरी चोरीच्या गुन्हयातील सराईत आरोपी असुन त्याच्यावर यापुर्वी इकडील तसेच मुंबई पोलीस आयुकतालय, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यात ०६ गुन्हे दाखल असल्याचा अभिलेख प्राप्त आहे.
सदरची कामगिरी श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१, मिरारोड, श्री. महेश तरडे सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विजयसिंह बागल, पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. हनिफ शेख, पो.उप.नि. किरण वंजारी, स.फौ.प्रशांत महाले, पो.हवा. प्रफुल्ल महाकुलकर, प्रदीप गाडेकर, बालाजी हरणे, राहुल गावडे, पो. अमं. अथर्व देवरे यांनी केलेली आहे.
