विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५,००,०००/- पंचवीस लाखाचे हस्तगत चोरीचे मोबाईल पोलिस उपायुक्तयांच्या हस्ते नागरिकांना परत.

Crime News Cyber Crime Political News Regional News ताज्या घडामोडी

(दि.२१) भांईदर– मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील २५,००,०००/- रुपये किंमतीचे १०० मिसिंग / चोरी झालेले मोबाईल मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत करुन नागरिकांना मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे यांच्या हस्ते परत करण्यात आले.

मिरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यात सर्वसामान्य नागरीकांचे मोबाईल मिसिंगचे प्रमाण वाढले होते. त्याबाबत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग मोबाईलमध्ये नागरिकांचे सर्व संपर्क, फोटो, व्हिडीओ, महत्वाचे कागदपत्रे तसेच आर्थिक व्यवहार इत्यादी व इतर अनेक महत्वाची माहिती नमुद असते. त्यामुळे जर एखादया नागरिकाचा मोबाईल फोन चोरी झाला किंवा हरविला तर सदर नागरीक हा अस्वस्थ होतो. याची दखल घेवून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी नागरीकांचे हरविलेले किंवा चोरी झालेले मोबाईल यांचा शोध घेवून त्यांना परत करण्याबाबत मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते.

त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोहवा. गोविंद केंद्रे, राजविर संधु, पो. अंम. हनुमंत सुर्यवंशी तसेच इतर अधिकारी आणि अंमलदार यांनी सर्व पोलीस ठाण्यातून मिसींग / चोरी झालेल्या मोबाईलची माहिती प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विष्लेषण केले. सदर विश्लेषणाचे आधारे मिरा भाईंदर – वसई विरार, बृहन्मुंबई, ठाणे शहर, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय तसेच पालघर व ठाणे ग्रामीण अधिक्षक कार्यालय परिसरात कसुन तपास करुन चोरी/हरविलेल्या मोबाईल फोनचा शोध घेवून आतापर्यंत आयुक्तालयातील वेगवेगळया पोलीस ठाणे अंतर्गत नोंद असलेले एकुण १०० मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश संपादन केले आहे.

व अश्या प्रकारे दिनांक २१/०४/२०२३ रोजी सायंकाळी गुन्हे शाखा कार्यालय, कनकिया, मिरा- भाईंदर वसई-विरार येथे श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांच्या हस्ते घेण्यात आलेल्या मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमादरम्यान सदरचे मोबाईल हे नागररिकांना परत मिळवुन दिल्याने नागरिकांनी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत नेमणुकीस असलेल्या मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी अंमलदार यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे.

सदरची कामगिरी श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पो. नि. श्री. राहुल राख, स.पो.नि. नितीन बेंद्रे, दत्तात्रय सरक, पो. हवा. आसिफ मुल्ला, मनोहर तावरे, सुनिल कुडवे, संग्राम गायकवाड, राजवीर संधु, शिवा पाटील, गोविंद केंद्रे, राजाराम काळे, प्रविणराज पवार, सतिष जगताप, महेश वेल्हे, जयकुमार राठोड, अनिल नागरे, पो. अंम. हनुमंत सुर्यवंशी, म. सु.ब. सचिन चौधरी, प्रशांत श्रीरामे तसेच स.फौ. संतोष चव्हाण, नेम. सायबर सेल यांनी केल्याने मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमास उपस्थित असेलेल्या नागरिकांनी सर्वांचे कौतुक केले आहे.

 

 

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply