कल्याण : दिनांक ०३/०७/२०२१ रोजी कल्याण रेल्वे स्टेशन फ्लॅट क्र. १ चे सीएसएमटी कडील बाजूचे टोकास अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून कोणत्यातरी धारधार हत्याराने बळीताचे मानेवर वर करून जीवे ठार मारलेबाबत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नमूद गुन्ह्याचे गांभीर्य पाहता गुन्हयाचा समांतर तपास श्री. कैसर खलिद , मा. पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई व एम एम मकानदार मा. पोलीस उप आयुक्त , मध्य परिमंडळ लोहमार्ग मुंबई यांचे सुचना व आदेशाप्रमाणे गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई अंतर्गत वेगवेगळे पथक तपास करीत होते. प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व माहितीच्या आधारे ठाणे युनिट क्र . २ चे पोलीस पथक देखील अहोरात्र गुन्ह्यातील आरोपीचा खास बातमीदारांचे मार्फतीने तसेच प्रभावी गस्त करून मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कसारा,खोपोली , पनवेल, तसेच इगतपुरी, नाशिक , भुसावळ, त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते बोर्डी रेल्वे स्टेशन तसेच शहर हद्दीत शोध घेत होते.
दिनांक १२/०७/२०२१ रोजी ठाणे यूनिट क्र . २ चे तपास पथक दादर ते सीएसमटी रेल्वे स्थानक व शहर हद्दीतील लगतच्या परिसरात आरोपीचा शोध घेत असतांना मशीद बंदर रेल्वे स्थानका बाहेरील पश्चिमेकडील बाजूस गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज मधील आरोपीच्या देहबोलीशी मिळत जुळत्या वर्णनाचा एक इसम तपास पथकास दिसून आला, त्यावेळी तपस पथकाने सदर इसमांस त्याब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला. पैशाच्या कारणावरून वाद झाल्याने मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचे कबूल केले.
सदरची कामगिरी श्री. कैसर खालिद , मा. पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई व एम एम मकानदार मा. पोलीस उप आयुक्त , मध्य परिमंडळ लोहमार्ग मुंबई यांचे सुचना व आदेशाप्रमाणे श्री. गजेंद्र पाटील , वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा , लोहमार्ग मुंबई यांचेसह ठाणे युनिट क्र . २ चे पोलीस उप निरीक्षक अशोक होळकर, मसहापोउप निरीक्षक मांजरेकर , पोहवा अतुल साळवी , अतुल धायडे , संदीप गायकवाड ,मिलींद भोजने, किशोर करपे , रविद्र दरेकर , पोना राजेश कोळशे , अमित बडेकर , यांनी केली आहे.
