दिनांक 18/08/2021 सकाळी 10/00 वा एक महिला नाव – स्मिता शरद पांचाळ, वय -51 वर्ष, राहणार- वीर सावरकर चौक, सीताराम नगर, उल्हासनगर 4 जिल्हा- नमूद महिला पोलीस ठाण्यात येऊन ठाणे अंमलदार एएसआय. भोसले यांना कळविले कि कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्टेशन प्रवासादरम्यान त्यांची गुलाबी रंगाची लेडीज पर्स चालू ट्रेन मधून खाली पडली असून व पर्स मध्ये दोन मोबाईल व काही कागदपत्र आहेत अशी माहिती ठाणे अंमलदार यांना सांगितल्याने पोहवा कदम ,पोना.शेळके,पोशि.वाघमोडे व मपोना. खांडगे असे सदर बॅग शोधणे कामी रेल्वे ट्रॅक मध्ये पायी जाण्यास सांगितले त्यांनी ट्रॅक मध्ये पायी चालत जाऊन सदर बॅग चा शोध घेतला असता सदरची बॅग कि मी नं 49/62 च्या जवळ मिळून आल्याने त्या बॅग मधील असणारे 2 मोबाईल 1 ओपो कंपनीचा पांढऱ्या रंगाचा मोबाईल किंमत अंदाजे 10000 रु व विवो सिल्व्हर रंगाचा 17000 रूपये किंमतीचा मोबाईल व इतर कागदपत्रे सह सदर बॅग पोलीस ठाण्यात आणून वपोनी मुकेश ढगे सो यांच्या समोर सदर बॅग बाबत खात्री करून सदर महिलेच्या ताब्यात दिली आहे. सदर तक्रारदार यांनी पोलिसांचे आभार मानले.
