चेंबूर : दि.२०/११/२०२१ रोजी मानखुर्द रेल्वे स्टेशन वर दोन अज्ञात इसमांचे लोकल मधून उतरताना वाद निर्माण झाला त्यावरून आरोपी याने कोणत्यातरी धारधार हत्याराने पोटामध्ये वार करुन दिपक चंद्रकांत हिरे वय २९ वर्षे यास जबर जखमी करुन त्याचा खुन केला म्हणुन वाशी रेल्वे पोलीस ठाणे मुंबई येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता . सदर खुनाच्या गुन्हयातील अनोळखी आरोपीबाबत काहीएक माहीती उपलब्ध नव्हती तसेच रेल्वे पोलीस ठाणे यांचेकडील सीसीटीव्ही फुटेज वरुन अस्पष्ट असल्याने काहीएक माहीती प्राप्त होत नव्हती.सीसीटीव्ही फुटेज चे बारकाईने निरीक्षण करून , “सदरच्या खुनाच्या गुन्हयातील आरोपी हा खारघर नवी मुंबई परीसरातील असुन त्याच्यावर अजून ०५ गुन्ह्यांची नोंद होती त्यावरून हा गुन्हेगार सराईत आहे याची खबर प्रभारी पोलीसनिरीक्षक साळुखे यांना अवगत करुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कक्षाचे पथक तयार करून खारघर याठिकाणी सापळा रचून आरोपीस शिताफीने पकडण्यात आले . आरोपीकडे गुन्हयाबाबत कसुन विचारणा केली असता आरोपीने गुन्हयाची कबुली दिली सदर आरोपीस पुढील कायदेशीर कार्यवाही करीता वैदयकीय तपासणी करुन वाशी रेल्वे पोलीस ठाणे मुंबई यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री मिलिंद भारंबे सो, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे),श्री विरेश प्रभु सो,मा.पोलीस उपायुक्त ,श्री निलोत्पल सो व मा.सपोआ डी पुर्व नितीन अलकनुरे सो, कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ननावरे,पोउनि मुठे ,सफौ सावंत/,पोना तुपे/ व पोशि चालक | केदार यांचे पथकाने पार पाडली आहे.
