मिरारोड : अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाचे वपोनि श्री एस. एस. पाटील यांना दिनांक २४/१२/२०२१ रोजी बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, इलाईट बॉडी ॲन्ड ब्युटी स्पा (इलाईट स्पा दि सोल ऑफ माईंड) गाळा नं. ०२, सॉलीटेअर बिल्डीग नं. ०३, पुनमनगर, मिरारोड पूर्व या स्पामध्ये येणा-या गि-हाईकांकडुन मसाज व एक्स्ट्रा सर्व्हिसच्या (अतिरिक्त सेवा) नावाखाली जास्तीचे पैसे घेवुन मुली गि-हाईकाशी अश्लील चाळे करीत असतात व नमुद मुली करीत असलेल्या कृत्यास स्पाचे चालक /व्यवस्थापक प्रोत्साहीत करीत आहेत,
मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने वपोनि. श्री. पाटील यांनी बोगस गि-हाईक व पंच यांना इलाईट बॉडी ॲन्ड ब्युटी स्पा (इलाईट स्पा दि सोल ऑफ माईंड) या ठिकाणी पाठवुन सत्यता पडताळुन पोलीस पथकासह छापा टाकला आसता स्पा मध्ये एक महिला बोगस गि-हाईकाशी अश्लील चाळे करीत असतांना मिळुन आली. तसेच सदर स्पा ची महिला व्यवस्थापक व एक महिला फरार आरोपी यांनी आपसात संगनमत करुन बोगस गि-हाईकास ०३ महिला/मुलींना दाखवून मसाज व एक्स्ट्रा सर्व्हिस (अतिरिक्त सेवा) च्या नावाखाली ४,०००/- रु स्वीकारुन एका महिलेस बोगस गि-हाईकासमवेत पाठवुन सदरच्या कृत्यास प्रोत्साहीत केल्याचे निदर्शनास आल्याने महिला व्यवस्थापक व इतर ०३ महिला/मुली यांना बोगस गि-हाईकाकडुन स्वीकारलली व कॅश काऊन्टर मधुन जप्त केलेले असे एकुण ८०००/-रुपयांसह ताब्यात घेण्यात आले . सदर बाबत पोलीस अंमलदार/ केशव शिंदे, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मिरारोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ. श्री महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.नि. श्री. संपतराव पाटील, पोहवा/उमेश पाटील, पोहवा/ विजय निलंगे, पोहवा/ रामचंद्र पाटील, पोशि/ केशव शिंदे, मपोना/ वैष्णवी यंबर, मपोशि/ सुप्रिया तिवले, चा.पोना/ सम्राट गावडे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांनी केली आहे.
