मुंबई : दि. ०३/०१/ २२ रोजी अन्वरी अब्दुल रशीद शेख, वय ५० वर्षे यांनी वि. प. मार्ग पोलीस ठाणे येथे येवुन तक्रार दाखल केली कि त्यांच्या जवळ रखवालीत असणाऱ्या ०४ महीन्याच्या मुलीला इब्राहीम शेख नावाच्या इसमाने पळवुन नेले आहे.त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून वि. प. मार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटनेच्या अनुषंगाने व.पो.नि संध्याराणी भोसले व पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व अंमलदारांची तपास पथके तयार करण्यात आली. सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा बारकाईने अभ्यास करून तसेच गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे मिळालेल्या माहीतीवरून अथक प्रयत्न व परिश्रम करून नमुद गुन्हयातील एक आरोपी इब्राहीम अलताफ शेख यास प्रथम ताब्यात घेतले. त्याचा सखोल तपास करून सायन, धारावी, मालाड, जोगेश्वरी, नागपाडा, कल्याण, ठाणे अशा विविध परिसरात छापे टाकुन ०२ महीला व ०४ पुरूष अशा एकुण ०६ आरोपीनां पोलीसांनी अटक केली. सदर गुन्हयाच्या तपासात अटक केलेल्या आरोपींन कडुन गुन्हयातील अपहरण केलेल्या मुलीला त्यांनी कर्नाटक, तामिळनाडु राज्यामध्ये विक्री केल्याची माहीती समोर आली त्या अनुषंगाने पोउनि दिलीप तांबे आणि पोउनि अभिजित देशमुख यांची दोन पथके तामिळनाडु व कर्नाटक या राज्यामध्ये तपासाकरीता तात्काळ रवाना केली.
पोउनि तांबे यांच्या पथकाने तामिळनाडु राज्यात आरोपींचा व अपहरण केलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी तीन जिल्हयामध्ये वेगवेगळया ठिकाणी चार दिवस अविरत विश्रांती न घेता चिकाटीने मानवी कौशल्य वापरून व तांत्रिक तपास करून अपहरण केलेल्या मुलीस सेलवानपट्टी पोलीस स्टेशन, कोईमतुर, तामिळनाडु येथुन कायदेशीररित्या सुखरूप ताब्यात घेतले. तसेच सदर गुन्हयात सहभागी असलेल्या तामिळनाडु येथील ०१ महीला व ०४ पुरूष अशा एकुण ०५ आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले. अशाप्रकारे सदर गुन्हयात सर्व पोलीस पथकांनी आपले मानवी कौशल्य पणास लावुन जलद गतीने हा गुन्हा उघडकीस आणला आहे. नमुद बालीकेस आरोपींनी ४,८०,०००/- रूपयास विक्री केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.यातील अपहरण झालेल्या बालीकेची आई ही दि. ०१/१२/२१ पासुन तिच्या कामाकरीता बाहेर गेली ती अद्याप परत आलेली नसून पोलिस तीचा शोध करीत आहे. तसेच आरोपी इब्राहीम शेख हा बालीकेच्या आईचा मित्र असुन तो लिव इन रिलेशनशिपमध्ये तिच्यासोबत राहत होता. तसेच तो बालीकेचा वडील असल्याचे सांगत आहे. तरी बालीकेच्या पालकांची निश्चित ओळख पटण्याकरीता बालीकेची व आरोपी इब्राहीम याची डी.एन.ए. टेस्ट करण्याची प्रक्रिया चालु आहे. तसेच अपहरण झालेल्या बालीका हीला बाल कल्याण समिती समोर हजर करून त्यांचे आदेश प्राप्त करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
नमुद गुन्हयाचा तपास श्री. विश्वास नांगरे- पाटील, पोलीस सह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, बृहन्मुंबई शहर, श्री. दिलीप सावंत, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई श्री.सौरभ त्रिपाठी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२, मुंबई, श्री. राजेंद्र चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त, गिरगांव विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संध्याराणी भोसले व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनायक पाटील, सपोनि अमित भोसले, सपोनि अविनाश शिंदे, पोउनि दिलीप तांबे, पोउनि राहुल पाटील, पोउनि हेमंत उगले, पोउनि उषा मस्कर, पोउनि अभिजित देशमुख, पोउनि सचिन आव्हाड, पोह सलीम मुजावर, पोना रूपेश परब, पोना मुन्ना सिंग, पोशि सचिन बरकडे, पोशि संदिप रोकडे, मपोशि शुभांगी देशमुख आणि मपोशि महाबली मुंदिनकेरी यांनी अथक परिश्रम घेवुन उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.
