सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. ०३.०४.२०२१ रोजी , नवघर पोलीस ठाणे हदित असलेले प्राईम बार अँड रेस्टॉरंट, नटराज बार ॲण्ड रेस्टॉरंट व एम.जी.कंट्रीबार या आस्थापनाचे चालक, मालक हे कोरोना विषाणुमुळे (कोवीड-१९) च्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन आप-आपल्या आस्थापना मध्ये गर्दी जमवुन शासनाच्या आदेशाचा भंग करुन आस्थापना चालु ठेवलेल्या खाद्य पदार्थ इत्यादी विक्री करीत आहेत अशी माहिती मिळाल्याने नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने नमुद आस्थापनावर छापा कारवाई केलेली आहे
१) प्राईम बार ॲण्ड रेस्टॉरंट, नवघर फाटक रोड,भाईदर पुर्व येथे आलेल्या ग्राहकांनी शासनाने ठरवुन दिलेल्या नियम,अटी शर्तीचे तसेच सोशल डिसटन्स चे पालन न करता विनामास्क गर्दी जमविलेल्या ८ इसमांविरुध्द नवघर पोलीस ठाण येथे गुन्हा रजि. नं. : २६१/२०२१ भा.दं.वि.सं.कलम १८८, २६९,२७०,२७१,२९० सह महाराष्ट्र कोवीड उपाय योजना २०२० चे नियम ११ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब) साथ रोग अधिनियम २.३,४ व मुंबई पोलीस अधिनियम ३३ (डब्ल्यु) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
२)नटराज बार ॲण्ड रेस्टॉरंट, नवघर फाटक रोड, भाईदर पुर्व येथे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे अटी शर्तीचे तसेच सोशल डिस्टन्स चे पालन न करता,विनामास्क गर्दी जमविलेल्या ५ इसमाविरुध्द नवघर पोलीस ठाणे येये गुन्हा रजि. नं. २६२/२०२१ भा.दं.वि.सं.कलम १८८,२६९, २७०,२७१,२९० सह महाराष्ट्र कोवीड उपाय योजना २०२० चे नियम ११ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब) साथ रोग अधिनियम २,३,४ व मुंबई पोलीस अधिनियम ३३ (डब्ल्यू) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
३) एम.जी.कंट्री बार,नवघर रोड, भाईंदर पुर्व येथे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे अटी शर्तीचे तसेच सोशल डिस्टन्सचे पालन न करता,विनामास्क गर्दी जमविलेल्या १६ इसमांविरुध्द नवघर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. 1 २५९/२०२१ भा.दं.वि.म.कलम १८८,२६९,२७०, २७२,२९० सह महाराष्ट्र कोवीड उपाय योजना २०२० चे नियम ११ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ११ (ब) साथ रोग अधिनियम २,३,४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही दि. ०३.०४.२०२२ रोजी रात्री ८.३० वा. ते ९.०५ या दरम्यान मा. श्री. अमीत काळे, पोलीस उप-आयुक्त,परिमंडळ-२,श्री शशीकांत भोसले, सहा. पोलीस आयुक्त, नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वपोनिरी/मिलींद देसाई, पोनि/मराठे(प्रशासन), पोलीस निरिक्षक /मासाळ(गुन्हे), स पोलीस निरिक्षक/ भास्कर पुल्ली पाोउनि/किरण बंजारी, पोउनि/संदिप ओहोळ, पोना/प्रशांत वाघ, आणि पथकाने केलेली आहे.
