गुन्हे प्रकटीकरण शाखा-१ मिरारोड यांना गडगपाडा चंदनसार, विरार पुर्वे येथे राहणारे ०२ इसम एटीम कार्डचे क्लोनींग करुन मिळालेल्या डेटावरुन नवीन ए.टी.एम. कार्ड बनवुन त्याव्दारे लोकांच्या खात्यातुन वेगवेगळया ए.टी.एम. मधुन पैसे काढुन फसवणुक करीत असल्याची गोपणीय माहिती मिळाली त्यावरून सपोनि/कुटे व गुन्हे शाखाचे पथकानी सदर ठिकाणी छापा टाकुन ०२ संशयीत इसमांना ताब्यात घेवुन तपास केला.
आरोपीत हे रेस्टॉरंट बार मध्ये वेटर म्हणुन काम करत असुन त्यांनी संगनमत करुन रेस्टॉरंट मध्ये येणारे ग्राहकांचे एटीएम/क्रेडीट कार्ड ग्राहकांची नजर चुकवुन स्वत:जवळील स्कॅनर मशिनवर स्वाईप करुन नंतर ग्राहकासमोर रेस्टॉरंटचे स्वाईप मशीनवर कार्ड स्वाईप करुन ग्राहक पीन नंबर टाकत असतांना चोरुन पाहुन कार्डचे शेवटचे चार नंबर व पिनकोड नंबर लक्षात ठेवत नंतर डायरीमध्ये लिहून घेवुन ए.टी.एम. स्किमर, मशिन, मॅग्नेटिक कार्ड रिडर, या साहीत्याचे आधारे सर्वसामान्य बैंक खातेदारांच्या क्रेडीट कार्ड व डेबीट कार्ड, एटीएम कार्डचा ईलेट्रॉनीक डाटा बेकायदेशिर पणे तो लॅपटॉप मध्ये एटीएम कार्डवरील डेटा रिड अँड राईट सॉफ्टवेअरचा वापर करुन डाटा दुसऱ्या बोगस एटीएम कार्डवर कॉपी करुन त्या आधारे बॅक खात्यातील पैसे काढुन घेवुन सर्व सामन्य जनतेची फसवणुक करत असल्याचे निष्पन्न झाले.
संशयीत आरोपीकडूण फसवणुक करण्याचे साहीत्य लॅपटॉप, मॅग्नेटिक कार्ड रिडर, मिनी ए.टी.एम. मशीन, ए.टी.एम. स्किमर, ६४ बोगस एटीएम कार्ड, ४१ बोगस चेक्स असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन आरोपी विरुध्द विरार पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १०८/२०२१ भा.द.वि. कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ सह आय.टी. अॅक्ट कलम ६६ (क) (ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.
सदरची कामगीरी डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. विजयकांत सागर, पोलीस उप
आयुक्त, वपोनि/जितेंद्र वनकोटी, गुन्हे प्रकटीकरण शाखा-१ मिरारोड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/विलास
कुटे, सफौ/राजु तांबे, आणि पथक यांनी केली आहे.
