रायगड येथे आश्रय ट्रस्ट च्या वतीने ऑक्सिजन मशीनचे वाटप.

Latest News

दि.१३/१०/२०२१  अष्टमी नवरात्री उत्सवाचे उत्सवाचे औचित्य साधुन आश्रय सामजिक शैक्षणिक ट्रस्ट या संस्थेच्या वतीने मेकिंग द डिफरन्स चे संस्थापक दीपक विश्वकर्मा यांच्या  समाजसेवी संस्था च्या मदतीने रायगड रोहा येथे ३ प्राथमिक आरोग्य केंद्राना ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आल्या. गेल्या २ वर्षापासून कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने बरेच जीव गमावले . ते फक्त ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे खास करुन ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ऑक्सिजनची असलेली कमतरता . ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेला योग्य प्रकारे उपचार व्हावे याकरीता आश्रय सामजिक संस्थेमार्फत हा उपक्रम रोहा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविण्यात आला.

यावेळी संस्थेचे संस्थापक श्री. दीपक मोरेश्वर नाईक,संस्थापक उपसचिव गुरुप्रसाद नाईक सहायक कोषाध्यक्ष विनोद मेढे रायगड जिल्हाध्यक्ष  प्रमोद सुधाकर पार्टे , श्री.रवींद्र तारु तंटामुक्ती अध्यक्ष, रोशन पडवल, व सर्व ग्रामस्थ व प्राथमिक आरोग्य केंद्र येथिल वैद्यकिय अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आश्रय ट्रस्ट तर्फे ब्लँकेट,बिस्किटे,कपडे,साड्या, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले.

सर्व डॉक्टरांनी मेकिंग द डिफरंस चे संस्थापक दीपक विश्वकर्मा व आश्रय ट्रस्टचे संस्थापक दीपक नाईक यांचे आभार मानले अतिशय गरजेची वस्तू मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतील अशी आशा डॉक्टरांनी वेक्त केली ग्रामीण भागात ताबडतोब उपचार होण्यास मदत होईल असे समाधान व्यक्त केले.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply