वसई- रस्ता सुरक्षा अभियान २०२६ च्या अनुषंगाने वाहतुक सुरक्षा नियम कायदे याबाबत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. अधिकमाहितीनुसार रस्ता सुरक्षा अभियान २०२६ च्या अनुषंगाने वसई विकासिनी कॉलेज ऑफ व्हिज्युअल आर्ट वसई पु. येथे वाहतुक नियंत्रण शाखा वसई यांचे तर्फे दिनांक २७/०१/२०२६ रोजी रस्ता सुरक्षा सप्ताह २०२६ च्या अनुषंगाने वाहतुक सुरक्षा नियम कायदे या बाबत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमाची प्रस्तावना सौ. वर्षा गावडे विभाग प्रमुख यांनी केली. डॉ. रिता सावला, राधे फाउंडेशनचे प्रमुख यांनी १०८/१२२ सेवेवर मोफत रुग्णवाहिका साठी कॉल करणे अपघाताची संपुर्ण माहीती देणे, रुग्णवाहिका चालकाने केलेल्या सर्व कॉलला उत्तर देणे, जेणे करुन रुग्णवाहिका अपघाताचे ठिकाणी लवकर पोहोचेल व रुग्णाला हॉस्पिटल मध्ये लवकरात लवकर पोहोचवता येईल. या बाबत मार्गदर्शन केले.
पोनि/सुजतिकुमार गुंजकर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना रस्ता अपघाताच्या कारणांबाबत माहिती दिली, तसेच रस्ता अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन केले व हेल्मेट परिधान करण्याचे महत्त्व सविस्तर पटवून दिले, विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याकरीता आवाहन केले.
सदर कार्यक्रमास श्री. विजय वर्तक (सेक्रेटरी) श्री. दत्तात्रेय ठोंबरे (प्राचार्य) प्रविण शिंदे (सहा. अधिव्याख्याता) सौ. वर्षा गावडे (विभाग प्रमुख) पोनि/सुजितकुमार गुंजकर पोउपनि/मेहबुब तडवी श्रेणी पोउपनिरी/ प्रभाकर पाटील पोहवा / लालासो बावदाणे मपोशि/काजल पाटील असे उपस्थित राहीले. कार्यक्रमामध्ये एकुण २०० ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी, ४० प्राध्यापक / शिक्षक व सहायक कर्मचारी सहभागी झाले होते.तसेच विद्यार्थ्यांनी हेल्मेट बाबतचे सेल्फी कट आउट मध्ये फोटो काढून हेल्मेट परिधान करण्याकरीता प्रचार व प्रसार करण्याचा निश्चय केला.
त्यानंतर महाराष्ट्र रस्ता सुरक्षा सप्ताह २०२६ च्या अनुषंगाने मार्गदर्शन सत्र या कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रम संपविण्यात आला.


