वालीव: मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात १५ दिवस “अँन्टी ड्रग ड्राईव्ह” ही अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवली जात आहे. त्या अनुषंगाने वालीव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०३/०२/२०२२ रोजी वालीव पोलीस ठाणे हद्दीतील स्मशानभुमी शेजारी, माधवनगर, मौर्या नाका, सातिवली येथे गांजा हा अंमली पदार्थ रब्बानी नावाचा इसम स्वत:च्या राहत्या घरात बेकायदेशीररित्या ठेवुन विक्री करत असल्याची गुप्त माहीती पोलिसांना मिळाली.
सदर कारवाई करण्याबाबत पोलीस उप आयुक्त यांनी आदेश दिल्याने पोनि/राहुलकुमार पाटील तसेच गुन्हेप्रकटिकरण अधिकारी व अंमलदार यांच्यासह कारवाई करण्यासाठी पथक तयार करुन सातिवली येथील माधवनगर, स्मशान भुमी जवळील रब्बानी यांच्या घराची झडती घेतली असता आरोपी रब्बानी शब्बीर खाटीक वय-३९ वर्षे हा स्वत:हा च्या राहत्या घरात ४ किलो वजनाचा गांजा एकुण ५५,३८०/- रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशीर बाळगत असतांना मिळुन आला. सदर बाबत वालीव पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस वालीव पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले असुन त्यांची अधिक चौकशी पोलीस करीत आहे.
वरील कामगीरी श्री. संजयकुमार पाटील पोलीस उप आयुक्त परीमंडळ – २ वसई, श्री. पंकज शिरसाट सहाय्यक पोलीस आयुक्त तुळींज विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पाटील (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण शाखेचे, सपोनि/ज्ञानेश फडतरे, पोहवा/मुकेश पवार, मनोज मोरे, पोना.सचिन दोरकर, किरण म्हात्रे, राजेंद्र फड, पो.अंम.गजानन गरीबे, सुर्यकांत मुंढे, सचिन खताळ, जयवंत खंडवी यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.
