अंधेरी : दिनांक ०९/१०/२०२१ रोजी कक्षाचे प्रपोनि श्री महेशकमार ठाकूर यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, सरेन रोड, गरुनानक पेट्रोल पंपा जवळ. अंधेरी पूर्व, मुंबई या ठिकाणा एक इसम बेकायदेशिर अग्निशस्त्राची विक्री करण्यासाठी येणार आहे. प्रपोनि श्री महेशकुमार ठाकुर याना सदरची माहिती वरिष्ठांना सांगून कक्षाच्या अधिकारी व अंमलदाराचा सुसंगत व नियोजनबद्ध सापळा रचून दिनांक ९/१०/२०२१ रोजी ११. २० च्या सुमारास एक संशयित व्यक्ती धेरी मेट्रो स्टेशन कडुन घाटकोपरच्या दिशेने रहदारी मध्ये पायी चालत होता नंतर थोड्या वेळाने तो कोणाची तरी वाट पाहत असल्याचे पोलिसांना दिसुन आला. हीच व्यक्ती अग्नीशस्त्र विक्रीस करण्यास आल्याबाबत गुप्त बातमीदाराने इशारा करताच पोलीस पथकाने त्यास घेराव घालून त्याला ताब्यात घेतले. आरोपीची झडती घेतली असता त्याच्या जवळ ०३ फैक्टरी मेड ऑटो लॉक बनावटीची पिस्टल, ०१ रिव्हाल्वर व १० जिवंत काडतुसे मिळुन आली.सदर आरोपी विरोधात एमआयडीसी पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करुन पुढील तपास पोलीस करीत आहे . अटक केलेल्या आरोपी याच्याविरुद्ध नवी मुंबई परिसरात खंडणी, विनयभंग, पोक्सो, चोरी, मारामारी, घातक हत्यारे जवळ बाळगणे हया सारखे गुन्हे दाखल आहेत.याप्रकारे सदर गुन्हेगार हा सराईत गुन्हेगारास घातक ०४ अग्नीशस्त्र व जिवंत काडतुसासह जेरबंद केले आहे.
सदरची यशस्वी कारवाई मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. मिलिंद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. एस. विरेश प्रभू, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) गुन्हे शाखा, श्री. दत्ता नलावडे,मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पश्चिम.अति.कार्य.) गुन्हे शाखा श्री. अलकनुरे यांचे मार्गदर्शनाखाली, कक्ष-१० गुप्रशा, मरोळ मुंबई येथील प्रभारी पोलीस निरीक्षक श्री महेशकुमार ठाकुर, पोलीस निरिक्षक श्री किरण लोंढे, पालीस निरिक्षक श्री उत्तम भजनावळे, सहाय्यक पालीस निरिक्षक श्री वाल्मिक कोरे, पोलीस अंमलदार अहमद शेख, जगदीश धारगळकर, रामकिशन मोरे, चंद्रशेखर डफळे, स्वाप्निल खेडेकर, प्रकाश चव्हाण यांनी पार पाडली आहे.
