लेडीज बार वर काशिमीरा पोलीसांनी टाकला छापा

काशिगाव, काशिमीरा, मिरा-भाईंदर येथील स्वागत लेडीज बार येथे बार चालक, मॅनेजर यांच्या प्रोत्साहनाने हे त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी बारमधील महिला वेटर ह्यांना अंग अर्धवट उघडे टाकून अश्लीश अंगविक्षेप करून ग्राहकांना आकर्षित करतात. अशा मिळालेल्या बातमी वरून काशिमीरा पोलीसांनी स्वागत बारवर छापा टाकला. तिथे ०७ महिला वेटर तोडके व तंगक कपडे परिधान करून, अंग अर्धवट उघडे टाकून […]

Continue Reading

वेश्याव्यवसायातून काशिमीरा पोलीसांनी केली दोन महिलांची सुटका

मुंबई, अहमदाबाद हायवे रोड लगत काशिगाव येथे साई रेसिडेन्सी लॉजिंग आणि बोर्डिंग मध्ये अवैद्य वेश्यव्यवसाय चालू असल्याची बातमी काशिमीरा पोलीसांना मिळाली. यावरून काशिमीरा पोलीसांनी साई रेसिडेन्सी लॉजिंग व बोर्डिंग वर छापा टाकून दोन पीडित महिलेची वेश्या व्यवसायातून सुटका करून दिली. सदरची घटना दिनांक. २९/१२/२०२० रोजी रात्री घडली. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे १) विजय बाळकृष्ण कदम […]

Continue Reading

ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा१६ जानेवारी २०२१ पर्यंत बंद ;जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

ठाणे दि. 30 (जिमाका):अन्य देशांमध्ये आलेली कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता  असल्याने ठाणे  जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा दि.१६ जानेवारी २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय  जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या अनुषंगाने  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश  दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील  सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी […]

Continue Reading

संसदेच्या पेट्रोलियम समितीच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

संसदेच्या पेट्रोलियम व नैसर्गीक वायु या विषयावरील स्थायी समितीच्या सदस्यांनी  समितीचे अध्यक्ष रमेश बिधुरी  यांच्या  नेतृत्वाखाली बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. रमेश बिधुरी यांनी यावेळी राज्यपालांना समितीच्या कार्याची माहिती दिली. समितीचे सदस्य खा. डॉ भागवत कराड, खा. राजन विचारे, आंध्र प्रदेश येथील खासदार श्रीमती चिंता अनुराधा, खासदार डॉ रमेश चंद बिंड (उप्र) व गिरीश चंद्र […]

Continue Reading

३१ डिसेंबरला मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस रस्त्यावर; हुल्लडबाजी करणाऱ्याना बसणार फटके

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी १ दिवसाची अवधी असताना मीरा भाईंदर, वसई विरार पोलीसांनी नवीन वर्षाच्या आगमनाकरिता सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन गृह विभाग यांच्या कडील मार्गदर्शन सूचना अन्वये राज्यात दिनांक. २२/१२/२०२० ते ०५/०१/२०२१ या कालावधीत रात्री ११. ते सकाळी ६.०० ची संचारबंदी लागू आहे.तसेच पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), […]

Continue Reading

पोलीस बातमी पत्र च्या नवीन २०२१ दिनदर्शिकेला मिळाल्या शुभेच्छा

मिरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त श्री.सदानंद दाते सो., भाईंदर(प) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक.श्री.चंद्रकांत जाधव तसेच, मिरा-भाईंदर महानगर पालिकेच्या महापौर सौ.जोत्स्ना जालिंदर हसनाऴे सो. यांनी साप्ताहिक वृत्तपत्र पोलीस बातमी पत्र च्या नवीन २०२१ दिनदर्शिकेला शुभेच्छा देताना, सोबत पोलीस बातमीपत्राचे संपादक- दिपक मोरेश्वर नाईक, पत्रकार – विनोद मेढे, प्रवीण सुर्वे, रवींद्र लाड.

Continue Reading

गुटख्याचा मोठा साठा पकडण्यामध्ये तलासरी पोलीसांचे मोठे यश

  तलासरी पोलीस ठाणे आरटीओ चेक पोस्ट दापचरी तालुका. डहाणू जिल्हा. पालघर येथे दिनांक. २७/१२/२०२० रोजी २:०० च्या सुमारास आरोपी नामे १) मोहम्मद रजीवा नजीर खान (वय-४०) राहायला. राज्य- उत्तरप्रदेश २) राकेश कोरी (वय-३०) राहायला. राज्य- उत्तरप्रदेश ३) गुलजार ४) फैझल ५) अशरफ यांनी त्यांच्या मालकीची आयसर टेम्पो क्रमांक एम. एच. ४८ ओजी ३७१८ व […]

Continue Reading

पोलीसांच्या जागरूकतेमुळे दरोडा घालण्यासाठी आलेल्या आरोपींना रंगेहात पकडले

शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक. १९/१२/२०२० रोजी सुमारास ५:०० च्या दरम्यान अर्हम ज्वेलर्स ६० फुट रोड, धारावी मुंबई येथे सशस्त्र दरोडा घालण्याच्या इराद्याने स्वतःच्या कब्जात विनापरवाना देशी बनावटीच्या गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, दोन चोपर एक स्टीलचे पाते असलेली तलवार, दोरखंड, मिरची पावडर, दोन मोटारसायकल वापरून आरोपी नामक १)अन्वर हुसाइन मोईनुद्दिन शेख (वय-३४) राहायला.सेनापती बापट […]

Continue Reading

पुरातन पंचधातूंची चोरी करणाऱ्या आरोपींना विरार पोलीसांनी केले गजाआड

विरार (पश्चिम) येथील शंभूनाथ जैन मंदिर येथे ५० वर्षापेक्षा पुरातन पंचधातूच्या १,६८,०००/- रुपये किंमतीच्या मुर्त्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्या बाबत विरार पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. १०५६/२०२० भादविस कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची घटना दिनांक. १५/१२/२०२० ते दिनांक. १६/१२/२०२० च्या दरम्यान घडली. गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा विरार कक्ष-३चे पोलीस निरीक्षक श्री. […]

Continue Reading

जीवनसाथी डॉट कॉम वरून तरुण महिलेची १३ लाखांची फसवणूक करणाऱ्याला अटक

वसई (पश्चिम) येथे राहणाऱ्या तरुण महिलेला विकास पाटील (वय-४२) नामक राहायला पुणे याने आपण उच्चशिक्षित असून मास्टर ऑफ आर्किटेक्ट असल्याचे भासवून जीवनसाथी डॉट कॉम या विवाह संकेतस्थळावरून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेळोवेळी ७,८१,०००/- रक्कम मिळवून तिची कार आपल्या ताब्यात ठेवून तिच्याशी लग्न न करता तिच्याकडून घेतलेली रक्कम आणि कार घेऊन तरुणीचा विश्वासघात करून एकूण […]

Continue Reading