मिरारोड : रिक्षामध्ये प्रवाशी म्हणून बसलेल्या प्रवाशांची लुटमार करणारे रिक्षाचालक चोरास अटक काशीमीरा पोलीस ठाणेची कामगीरी. अधिक माहीतीनुसार अहमदाबाद शहर, राज्य- गुजरात येथे राहणारे जिग्नेश आनंदभाई गोस्वामी वय ३५ वर्षे, धंदा – नोकरी हे दि.०९/१२/२०२३ रोजी दुपारच्या सुमारास मिरारोड येथे येवून काशिमिरा येथील हायवे लगत सरोजा लॉजिंग येथे थांबले होते. व संध्याकाळच्या जेवण्यासाठी ते आपल्या मित्रांसोबत जवळचे समुद्रा बार अॅण्ड रेस्टॉरंट येथे जावून रात्रौ १०.४५ वा. च्या सुमारास सरोजा लॉजिंगकडे अजित पॉलेस हॉटेल जवळून पायी चालत जात असतांना पाठीमागून आलेल्या रिक्षेला थांबवुन सरोज लॉजींग येथे सोडण्यास सांगून रिक्षात बसले. फिर्यादी यांची रिक्षा सरोजा हॉटेलच्या समोर रोडवर असतांना रिक्षाच्य़ा पाठिमागून एका मोटार सायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी रिक्षा समोर मोटार सायकल आडवी लावून थांबवली. त्यानंतर रिक्षाचालक तसेच फिर्यादी यांना तुम्ही रिक्षामध्ये ड्रग्ज घेवून जात आहात असे बोलून जबरदस्तीने फिर्यादी यांचा अंगावरील सोन्याचे दागीने किंमत १,७५,०००/- खेचून चोरून नेले याबाबत त्यांनी मजकुरचे दिलेल्या तक्रारी वरून दि.१०.१२.२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा जबरी चोरी व गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे पोलिसांनी तपास सुरु केला. पोलीसांनी फिर्यादी यांनी रिक्षातून प्रवास केलेल्या रिक्षा चालकाकडे तपास केला. घटनास्थळ, येणारा व जाणारा मार्ग आणि आजुबाजुचे सी. सी. टी. व्ही. कॅमेरांचे फुटेज तपासले असता नमुद गुन्हयात रिक्षाचालकाचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यास विश्वासात घेवून सखोल तपास केला असता नमुद रिक्षाचालकाने व त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
गुन्हयाच्या तपासात निष्पन्न आरोपी रिक्षाचालक प्रदिप दिलीप सवादकर वय-२९ वर्षे धंदा – रिक्षाचालक रा-रुम नं-२०१, हनुमान मंदिरच्या बाजुची बिल्डिंग, पेणकरपाडा, काशिमिरा, ठाणे त्याचे साथीदार १) जियाउल्ला ऊर्फ सोनु निजात खान वय २६ वर्षे, धंदा – रिक्षाचालक रा – के. एन. शेख कंपाउंड, मधुबन बिल्डिंगजवळ, केतकीपाडा, दहीसर-पुर्व, मुंबई, २) अरशद बासीद खान वय – ३८ वर्षे, व्यवसाय-रिक्षाचालक रा-गणेश मंदिराजवळ, मिरागाव, मिरारोड- पुर्व, ठाणे यांचा अथक परिश्रमाने शोध घेवून वरील तिघांना दि.१०/१२/२०२३ रोजी अटक करण्यात आली असुन पोलीस कोठडी रिमांड मुदतीत आरोपीने चोरी केलेली मालमत्ता, गुन्हयात वापरलेली रिक्षा व मोटार सायकल असा एकूण ३,१५,०००/- रुपये किंमतीची मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून नमुद गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि / शिवाजी खाडे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री. जयंत बजबळे – पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ०१, श्री. महेश तरडे, सहा.पो.आयुक्त, मिरारोड विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संदिप कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काशिमिरा पोलीस ठाणे, श्री. समीर शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे), स. पो. नि. योगेश काळे, पो.उप निरी. शिवाजी खाडे, सहा.फौ. अनिल पवार, पो. हवा. दिपक वारे, प्रताप पाचुंदे, राहुल सोनकांबळे, निलेश शिंदे, निकम, पो.अं. रवी कांबळे, प्रविण टोबरे, किरण विरकर, राजेंद्र सुर्यवंशी यांनी केलेली आहे.
