मिरारोड : चार चाकी वाहने भाडयाने घेवुन ती परस्पर विक्री करुन फसवणुक करणाऱ्याला गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा यांनी अटक केली आहे. अधिक माहितीनुसार शांती पार्क ,बी / ७ /२०४, युनिक क्लस्टर,मिरारोड पुर्व, येथे राहणारे विनोद सुभाष पवार वय – ३७ वर्षे, यांना आरोपी शाल चाळके, वय-४० वर्षे, याने एक इर्टीका कार दाखवुन सदर गाडी विक्री करायची आहे असे सांगून विनोद पवार यांना ती गाडी रोख रक्कम चार लाख रुपये घेवुन कोऱ्या कागदावर गाडी विक्री केली असल्याचे लिहुन देवुन गाडी विकली . त्यानंतर त्या गाडीचे मुळ मालक भगवानराव शांताराम तकारखेडे आले व हि गाडी आपली आहे असे सांगून ते पवार यांच्याकडून गाडी घेवुन गेले. झालेल्या प्रकाराची माहिती पवार यांनी आरोपी विशाल चाळके यास संगितले असता त्यावेळी आरोपी याने भगवानराव तकारखेडे यांचेशी झालेला व्यवहार माझा असल्याचे सांगुन विनोद सुभाष पवार यांचे पैसे परत देतो असे सांगुन पैसे परत न करता त्यांची फसवणुक केली . म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयांचा समांतर तपास गुन्हे शाखा – १ करीत असतांना बातमीदार यांच्याकडून सपोनिरी प्रशांत गांगुर्डे यांना मिळालेल्या माहीतीवरुन सदर गुन्हयांतील आरोपी यांचा शोध घेत असतांना आरोपी विशाल विलास चाळके वय- ३८ वर्षे, व्यवसाय – गाडया खरेदी विक्री, रा. भोरी चाळ रुम नं. ४३७, म्हाडा कॉलनी, राम मंदिर, गोरेगांव पश्चिम, मुंबई, हा धानीव बाग वसई पुर्व येथे असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी आरोपीस दिनांक ०१/०८/२०२३ रोजी ताब्यात घेतले. पोलिसांनी विशाल चाळके याची सखोल तपासणी केली असता त्याने गुन्हयांतील गाडी क्रमांक एमएच/४६ / बीव्ही / १४१७ ही मुळ मालक भगवानराव तकारखेडे यांच्या कडुन ५०,००० रुपये महिना भाडयाने घेवुन ती त्यांनी विनोद सुभाष पवार यांना चार लाख रुपयांना परस्पर विक्री केल्याचे सांगितले त्यानंतर आरोपीची अजून सखोल विचारपुस करता त्याने अशाच प्रकारे पुणे औरंगाबाद, नांदेड, व महाराष्ट्रात इतर ठिकाणी लोकांना फसवुन ०८ गाडया विक्री केल्याचे कबूल केले. आरोपी याने मुळ मालक यांची फसवणुक करुन परस्पर एकुण ४२,५०,०००/- रुपये किमतीच्या गाड्या विक्री केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे त्याचप्रमाणे अटक आरोपी विशाल चाळके हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरोधात मुंबई, नवी मुंबई, ठाणे पोलिस आयुक्तालयात अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे २५ ते ३० गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगीरी मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त सो, गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा येथील पो. नि. अविराज कुराडे, स. पो. नि. कैलास टोकले, स.पो.नि. प्रशांत गांगुर्डे स.पो.निरी पुष्पराज सुर्वे, स. फौ. राजु तांबे, संदीप शिंदे, पो.हवा. अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, प्पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, सचिन सावंत, सचिन हुले, समीर यादव, सुधिर खोत, विकास राजपुत, पो.अं.प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी तसेच स. फौज. संतोष चव्हाण, सायबर विभाग, तसेच म. सु. ब. चे किरण आसवले यांनी केली आहे.
