दिनांक १९/०७/२०२१ रोजी पोलीस ठाणे येथे मधुकर दामोदर काविनकर वय ४४ वर्षे रा. विरार पूर्व,यांनी तक्रार दिली की, ते काम करीत असलेल्या पटेल इंन्डस्ट्रीज, दहिसर पूर्व मुंबई. येथील कारखान्यामध्ये तयार करण्यात आलेला सोन्याचा माल (नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या बांगडया एकुण ७७ नग ) किमत रूपये ४६,५०,०००/- हा झवेरी बाजार, मुंबादेवी, मुंबई येथे सोन्याचे व्यापारी यांना देण्याकरीता दहिसर येथुन बसने प्रवास करीत असताना गुंदवली बसस्टॉप वेर्स्टन एक्सप्रेस हायवे अंधेरी पूर्व मुंबई येथे अनोळखी इसमांच्या टोळीने कट रचुन जबरदस्तीने खेचुन पळुन गेले. सदरबाबत अंधेरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान गोपनीय बातमीदार, अशा प्रकारे गुन्हे करना-या आरोपीताचा अभिलेख तसेच तांत्रिक व कौशल्यापूर्ण जलद गतीने तपास करून यातील पाच आरोपीना मध्ये प्रदेश महाराष्ट्र सिमेवरील टोल नाक्यावर सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेण्यात आले.गुन्हयाच्या तपासा दरम्यान अटक आरोपीचां म्होरक्या अमिन मोहम्मद शेख वय ४९ वर्षे याने कट रचून त्याच्या साथीदारांच्या मदतीने तक्रारदार यांना बसमध्ये तीनही बाजुंनी गर्दी केली, गर्दीचा फायदा घेवून वर नमुद मुद्देमाल असलेली लेदरची बॅग जबरीने खेचून, त्याचवेळी टोळीतील इतर सदस्याने तक्रारदार यांना विरूध्द दिशेला हात दाखवून चोर पळून गेल्याचे सांगून त्यांची दिशाभूल केली व मुद्देमाल असलेली बॅग टोळीतील इजर सदस्यांन मार्फत लंपास केली.त्यानंतर सदर आरोपी नावे- १) महेंद्र लहु मोरे वय ४५ वर्षे, २) मनोज कांतीलाल मेढे वय ३३ वर्षे, ३) आमीन मोहम्मद शेख वय ४९ वर्षे, ४) शशिकांत चंद्रकांत कोलवालकर वय ६३ वर्षे ५) विजयकुमार फुलचंद गुप्ता वय ३८ वर्षे ६) मनिष देवीलाल दर्जी वय ३४ वर्षे, ७) शैतानसिंग मोतीसिंग राजपुत वय ३८ वर्षे.यांनी वर नमुद वर्णनाची मालमत्ता राज्यस्थान येथे विकली असल्याचे तपासात उघड झाल्याने जिल्हा – जालोर राज्यस्थान येथून दोन आरोपीताना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली असुन, त्यांचे कडुन नमुद गुन्हयातील एकुण ४७५ ग्रॅम वजनाचे सोने किंमत रूपये २४,२८,३३८/मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० डॉ. महेश्वर रेड्डी, श्री. मुकुंद पवार सहायक पोलीस आयुक्त अंधेरी विभाग, श्री. विजय बेळगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंधेरी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. पिसाळ, पोउनि. पगार, पो.ह. संखे, पो.ह.लाड, पो.ना. घरत, बर्गे, विशाल पिसाळ, पो.शि. जाधव, बाबर, कापसे, सोनजे, राठोड, चव्हाण, मोरे, प्रविण जाधव, पाटील, यांनी पार पाडली.
