भाईंदर : एटीएम कार्डची अदलाबदल करुन फसवणूक करणा-या आरोपीस नवघर पोलीसांनी केली अटक.अधिक माहीतीनुसार तक्रारदार हे एटीएम मधुन पैसे काढण्यासाठी दिनांक-०७/०६/२०२२ रोजी बंदरवाडी नाका, भाईंदर रेल्वे स्टेशनजवळ, ओस्तवाल शॉपिंग सेंटर, नवघर रोड येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये गेले होते त्यावेळी सदर एटीएम मशीनमधून पैसे काढत असतांना एक अनोळखी इसम हा त्यांच्या पाठीमागुन त्या ठिकाणी आला व तक्रारदार हे वयोवृध्द असल्याने त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड हातचलाखीने स्वत:कडे घेतले व त्याचे स्वत:कडील बंद एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड तक्रारदार यांना दिले व ते कार्ड पुन्हा एटीएम मशीनमध्ये टाकुन त्या व्यक्तीने एटीएम चा पिनकोड विचारला पण एटीएम कार्ड बदली केले असल्याने मशीनमधुन पैसे निघाले नाही. त्यानंतर सदर अनोळखी इसम हा फिर्यादी यांचे एटीएम कार्ड घेवुन तेथुन निघुन गेला. व त्याने एटीएम कार्डचा वापर करुन त्यांच्या एसबीआय बँकेच्या बँक खात्यातुन एकुण २,०६,१८५/-रुपये (अक्षरी- दोन लाख सहा हजार एकशे पंच्यांशी रुपये) वेगवेगळया एटीएम मधुन काढले व सदर कार्डचा वापर करुन वस्तु खरेदी केल्या आहेत. सदरची बाब तक्रारदार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नवघर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुर करण्यात आला. गुन्हयाच्या तपासादरम्यान नवघर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळावरील तांत्रीक पुरावे व माहीतीच्या आधारे आरोपीस ताब्यात घेतले . सदर आरोपी याच्याकडे पोलीस कस्टडी दरम्यान विचारपुस करुन त्याच्याकडून गुन्हयांतील फसवणुक झालेल्या रकमेपैकी १,५५,४६०/- रुपये किंमतीची मालमत्ता ( रोख रक्कम रुपये-४८५००/-, एलईडी टीव्ही, सिलींग फॅन, कपडे, पाठीवरील सँग, बुट व आरोपी वापरत असलेला मोबाईल फोन ) पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपीची अधिक चौकशी केली असता आरोपी कडे वेगवेगळया बँकाचे एकुण-३७ एटीएम कार्ड तसेच त्याच्यावर अश्या प्रकारचे अजून दोन गुन्हे असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.
त्याचप्रमाणे अटक आरोपी याच्याकडे मिळून आलेली वेगवेगळया बँकेची एकुण-३७ एटीएम कार्डबाबत संबधीत बँकाकडून माहिती मिळवून त्याचप्रमाणे सदर आरोपी याने आणखी काही गुन्हे केलेले आहेत याबाबत अधिक तपास चालु आहे.
सदरची कामगिरी श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) अती. कार्य. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, डॉ. श्री शशीकांत भोसले, सहा. पो. आयुक्त, नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, श्री. सुशीलकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि योगेश काळे, पोउपनि/अभिजित लांडे, पोह/भुषण पाटील, पोना/गणेश जावळे, पोशि/नवनाथ घुगे, पोशि/सुरज घुनावत, पोशि/विनोद जाधव, पोशि/ओमकार यादव यांनी केलेली आहे.
