८ महागड्या दुचाकी जप्त – मोटार सायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात.

Crime News

नंदुरबार : मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या मोटार सायकल चोरीचा लवकरात लवकर निर्णय लावण्याच्या दृष्टीने  मा.प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार यांनी मासिक गुन्हे बैठकीत मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला व या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे निर्देश  मा.प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार यांना देण्यात आले होते.  वरिष्ठांच्या वरील सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटार सायकल चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन . तसेच आपल्या  बातमीदारांमार्फत माहिती घेवुन मोटर सायकल चोरांचा शोध घेत असताना

दिनांक २६/४/२०२२ रोजी स नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरात भोणे फाटा भागात दोन इसम कमी किंमतीत मोटर सायकल विकत आहेत अशी बातमी मिळाल्याने, सदरची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना सांगितली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे 02 पथके तयार करून मिळालेल्या जागेच्या ठिकाणी सापळा रचला असता  एका पान टपरी जवळ दोन इसम एका विना नंबर प्लेट असलेल्या मोटार सायकलसह उभे होते त्यांना  पोलिसांची चाहूल लागताच   ती मोटारसायकल तेथेच सोडून पळून गेले. त्यातील आरोपी खोजल्या वण्या तडवी रा. बिजरीगव्हाण ता. अक्कलकुवा यास पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले व त्याची मोटारसायकल बाबत विचारपूस केली असता त्याने पोलिसांना उडवा-उडवीची उत्तरे दिली म्हणून त्यास पोलीस ठाण्यात  आणुन त्यास विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, सदरची युनिकॉर्न मोटर सायकल ही त्याने व त्याचा चुलत भाऊ सुग्या सन्या तडवी या दोघांनी काही महिन्यापूर्वी   गुजरात राज्यातुन चोरुन आणल्याचे कबूल केले असून त्याने याअगोदर हि आपल्या चुलत भावा बरोबर मिळून असे गुन्हें केल्याचे हि कबूल केले आहे.आरोपीं कडून  लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ८ महागड्या मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. तसेच गुजरात राज्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे  उघडकिस करण्यात आलेले आहेत. तसेच आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपी खोजल्या वण्या तडवी यांच्या विरुध्द् यापुर्वी २३ मालमत्तेविरुध्दचे गुन्हे नंदुरबार, धुळे, जळगांव व गुजरात राज्यात दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी.आर.पाटील, मा.प्रभारी पोलीस अधिक्षक श्री. विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा.पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, सहा. पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी, पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे, पोलीस नाईक सुनिल पाडवी, विशाल नागरे, बापू बागुल, रमेश साळुखे, अभय राजपुत यांच्या पथकाने केली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply