३२ वे रस्ता सुरक्षा अभियान चा उद्घाटन सोहळा
दिनांक १८/०१/२०२१ रोजी वाहतूक शाखा वसई विरार याचे संयुक्त विद्यमाने ३२ वे रस्ता सुरक्षा अभियानचा उद्घाटन समारंभ संघवी हॉल, अंबाडी नाका, वसई पश्चिम येथे मा. पोलीस आयुक्त श्री. सदानंद दाते, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. एस. जयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ श्री. संजयकुमार पाटील मा. पोलीस उप आयुक्त ०३ श्री. प्रशांत वाघुंडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रतिष्ठीत नागरिक, रिक्षा/ टॅक्सी युनियनचे पदाधिकारी व पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया याचे प्रतिनिधी तसेच वाहतूक अधिकारी व अंमलदार असे उपस्थितीत होते. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक पोलीस निरीक्षक शेखर डोंबे यांनी केले. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ व ०३ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन पोलीस हवालदार राजू गायकवाड यांनी केले.
३२ वे रस्ता सुरक्षा अभियान हे दिनांक १८/०१/२०२१ ते दिनांक. १७/०२/२०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. सदर कालावधीत वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृत करण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन केल्यास होणारे अपघात यामुळे वाहन चालक त्याच बरोबर त्यांचे कुटुंबीयांची होणारी आतोनात हानी याबाबत तसेच हेल्मेट, सीटबेल्ट चा वापर करणे, सिग्नल जम्पिंग, ट्रिपल सीट, अवैध प्रवासी वाहतूक टाळणे,वाहन चालविताना वेगाची मर्यादा पाळणे, मद्याचे अंमलाखाली असताना वाहन चालविणे टाळावे या व इतर वाहतुकीचे नियमांबाबत जनजागृती करून विशेषत शाळा/ कॉलेज चे विद्यार्थी यांना प्रबोधन करण्यात येत आहे. बॅनर/ पोस्टर/ परिपत्रक/ केबल नेटवर्क/ पथनाट्य वर्तमान पत्रांचे आधारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून रस्ता वाहतुकीचे नियमांचे पालन व अपघातांचे प्रमाण कसे कमी होईल याबाबत प्रयत्न करीत आहेत. सदरचे रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी होण्याकरिता नागरिकांचे सह कार्यही तेवढेच मोलाचे आहे.
