नवीन वर्षाच्या स्वागतासाठी १ दिवसाची अवधी असताना मीरा भाईंदर, वसई विरार पोलीसांनी नवीन वर्षाच्या आगमनाकरिता सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन गृह विभाग यांच्या कडील मार्गदर्शन सूचना अन्वये राज्यात दिनांक. २२/१२/२०२० ते ०५/०१/२०२१ या कालावधीत रात्री ११. ते सकाळी ६.०० ची संचारबंदी लागू आहे.तसेच पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), मीरा भाईंदर, वसई विरार यांचे फैजिदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलाम १४४ (१) (३) अन्वये दिनांक. २२/१२/२०२१ ते दिनांक. ०५/०१/२०२१ रोजी पर्यंत दररोज रात्री ११.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत संचारबंदी मनाई आदेश लागू झाला आहे. सदर आदेशाचे पालन करून नागरिकांनी ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाचा निरोप देऊन नूतनवर्षाचे स्वागत करावे असे मीरा भाईंदर, वसई विरार पोलीसाकडून नागरिकांना आवहान करण्यात आले आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठा, चौक, रस्ते, समुद्रकिनारे या ठिकाणी पोलीस फिक्सपॉईंट, नाकाबंदी, पेट्रोलिंग नेमण्यात आले आहे. मद्य पिऊन वाहन चालविणारे वाहन चालक तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकाविरुद्ध वाहतूक विभागाकडून मोहीम राबवली जाणार आहे. तसेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हॉटेल/ रीसोर्टन आणि इतर ठिकाणी पार्ट्या अमली पदार्थाचे सेवन होणार नाही याकरिता विशेष पथक तयार करण्यात आले आहे. तसेच असं काही निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नाकाबंदी, पेट्रोलिंग व चेकिंग साठी पोलीस अधिकारी, अंमलदार आर.सी.पी. पथक, राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड हे बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहे.
दिनांक. ३१ डिसेंबर २०२० रोजी ते दिनांक. १ जानेवारी २०२१ रोजी पहाटे रस्त्यांवर, समुद्रकिनारी, हॉटेल, रिसॉर्ट येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस दलाने चोख बंदोबस्ताचे आयोजन केले आहे. तिन्ही पोलीस झोन मध्ये संबधीत पोलीस उप आयुक्त हे बंदोबस्त प्रभारी राहणार असून पोलीस आयुक्त हे बंदोबस्तावर नियंत्रण ठेवणार आहेत.
