सानपाडा- एका तरुणावर शारीरिक मारहाण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपी फरार झाला. याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यांनी अवघ्या चोवीस तासात कोणताही पुरावा नसताना हत्येचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे.
तरुणाने आरोपीकडून तंबाखू मागितल्यावर आरोपी “मी दुकानदार आहे का?” असे बोलल्याचा राग मनात धरून तरुणाने आरोपीला थप्पड व लाथ मारली. त्याचा राग आरोपीने मनात धरून तरुणाच्या डोक्यावर पाठीमागून लोखंडी चौकोनी पाईपने मारून खून केल्याची बाब उघड झाली आहे. रवी ओमकार शर्मा हे आरोपीचे नाव आहे.
हकीकत अशी की, दिनांक १९/११/२०२० रोजी दुपारी ४:५०वाजता सुमारास पामबीच रोड वाशी रेल्वे वीजवर जखमी तरुण पडून असल्याची नियंत्रण कक्ष नवी मुंबई यांच्याकडून माहिती मिळाली. त्यामुळे सानपाडा पोलीसांनी तात्काळ कारवाई करून त्या तरुणास उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल केले डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे अतिरक्तस्त्रावाने सदर तरुणाचे मृत्यू झाले. अकस्मात मृत्यू म्हणून दाखल झालेल्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल तपास करण्यात आला.
सदर तरुणास आरोपी कडून लोखंडी चौकोनी पैठणी डोक्यावर पाठीमागून ठार करून त्याचा खून केल्याचे आढळून आले त्यानुसार, आरोपी रवी शर्मा विरुद्ध सानपाडा पोलीस ठाणे गु. रजि१२४/२०२० भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची धडाकेबाज कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री. बिपिन कुमार सिंह, माननीय सह पोलीस आयुक्त श्री. विजय जाधव, माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. वी.जी.शेखर पाटील , माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ श्री.सुरेश मेंगडे आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.भरत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुभाष निकम, पोलीस निरीक्षक श्री. बापूसाहेब देशमुख , सहाय्यक पोलीस निरीक्षक. निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक परशुराम भातुसे आधी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी याकामी मेहनत घेतली.सदर होण्याचा पुढील अधिक तपास चालू आहे
