भाईंदर : दिनांक ०१/०७/२०२१ रोजी नवघर पोलीस स्टेशन इथे फिर्यादीने त्यांचे पती व साथीदाराने आपल्या १४ महिन्याचा मुलीचे अपहरण करून कोठेतरी पळून गेलेले आहेत अशी रीतसर तक्रार केली . सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नवघर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होतो.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस येण्याकरिता वरिष्ठानी सूचना दिल्या होत्या . दिलेल्या सूचनेनुसार नवघर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर घटनेबाबत सविस्तर माहिती प्राप्त करून तपास केला असता तपासामध्ये निदर्शनास आले कि , अपहरण झालेली मुलगी हिला तिचे वडील व त्याचा एक साथीदार (विधिसंघर्षित बालक) यांनी मिळुन भाईंदर पूर्व येथून अपहरण केल्याचे समजून आले. त्यावरून तांत्रिक बाबींचा आधार घेऊन माहिती मिळवली कि यातील आरोपी हे मुलीस घेऊन मुंबई सी .एस.एम. टी रेल्वे स्थानक येथून हावडा मुंबई मेलने त्यांचे मूळ गावी कांचीपुर , राज्य पश्चिम बंगाल येथे जाणार आहे . त्या अनुशंगाने तपस पथकाने सी .एस.एम. टी रेल्वे पोलीस ,कल्याण रेल्वे पोलीस व ईगतपुरी रेल्वे पोलीस यांचेशी सातत्याने समन्वय साधून अपहृत मुलीस तिचे वडील व त्याचा साथीदार यांना ईगतपुरी रेल्वे स्थानकावर हावडा मुंबई मेल या गाडीतून ईगतपुरी रेल्वे पोलीस नाशिक यांच्या मदतीने ताब्यात घेतले. नमूद गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून नवघर पोलिसांनी सदरचा गुन्हा अवघा ६ तासात उघडकीस आणून अपहरण केलेल्या मुलीस फिर्यादी यांचे ताब्यात दिले आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढे तपास सपोनि. आरती गवारे , नवघर पोलीस ठाणे ह्या करीत आहेत .
सदरची कामगिरी श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त , परिमंडळ -०१, व डॉ . शशिकांत भोसले , सहा . पो. आयुक्त , यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिलींद देसाई , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , नवघर पोलीस ठाणे , पोनि . प्रकाश मासाळ (गुन्हे), सपोनि . भास्कर पुल्ली . योगेश काळे . पोउनि . संदीप ओहळ , पोना. रविंद्र भालेराव , पोना . एन्नोद्दिन शेख , पोशि. अनिल सुर्वे , पोशि.संदीप जाधव यांनी केली आहे.
