नालासोपारा – बलात्कार करुन आत्महत्येस प्रवृत्त करणा-या व १० वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीस जेरबंद गुन्हे शाखा, कक्ष ३ ची कामगिरी.
अधिक माहितीनुसार मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय हद्दीतील दाखल गंभिर गुन्हयातील पाहिजे व फरार आरोपींची शोध मोहिम राबविण्याचे मा. वरिष्ठांनी पोलीस पथकास सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने कार्यवाही करीत असताना, दिनांक १४/०२/२०१३ रोजी ते दिनांक २०/०४/२०१३ रोजी डॉन लेन, आचोळे रोड, नालासोपारा (पुर्व) येथे आरोपी सुलतान ऊर्फ राजा नुरमोहम्मद शेख याने फिर्यादी यांची मुलगी वय १९ वर्षे हिस कोल्ड्रींकमधून गुंगीकारक औषध पिण्यास देवून ती बेशुध्द अवस्थेत असताना तिच्यावर बलात्कार केला होता, त्यामुळे ती गरोदर राहून तिने सदरची माहिती आरोपीस सांगितल्याने आरोपीने तिला तु इतर कोणास सांगितले तर तुझा एमएमएस सर्वांना दाखवेल अशी धमकी देवुन मारहाण व शिवीगाळी केली होती. सदर घटनेमुळे फिर्यादी यांच्या मुलीने भितीने अंगावर रॉकेल टाकुन स्वःतास पेटवुन घेतल्याने ती मयत झाली होती. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दिनांक २२/०४/२०१३ रोजी नालासोपारा पोलीस ठाणे येथेहा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपी सुलतान ऊर्फ राजा नुरमोहम्मद शेख, वय २९ वर्षे, रा. रेहमतनगर, नालासोपारा पुर्व याचा गुन्हे शाखा, कक्ष ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेवून नमूद गुन्हयात दिनांक ०१/१०/२०२२ रोजी ताब्यात घेतले व त्याचा प्राथमिक तपास केला असता त्याने तो मागील ९ वर्षापासुन उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल येथे आपले अस्तित्व लपवुन दडुन राहत असल्याचे सांगितले. नमूद आरोपीस पुढील कारवाई करीता नालासोपारा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अति. कार्यभार पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक श्री. प्रमोद बडाख, पो.उप.निरी. शिवाजी खाडे, उमेश भागवत, पो.हवा. मुकेश तटकरे, शंकर शिंदे, सागर बारवकर, सचिन घेरे, पो.ना. मनोज सकपाळ, पो.अं. अश्विन पाटील, सुमित जाधव यांनी पार पाडलेली आहे.
