हुबेहूब महिलांचा आवाज काढून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश – कशिमीरा येथील घटना.

Crime News Cyber Crime Latest News Political News ताज्या घडामोडी

भाईंदर : महिलेच्या आवाजात बोलुन लोकांची फसवणुक करणा-या आरोपींस गुन्हे शाखा, कक्ष १ काशिमीरा यांनी अटक केली. अधिकमाहिती नुसार दिनांक ०७/०५/२०२३ रोजी आरोपी याने महिलेच्या आवाजात श्रीराम ज्वेलर्सचे मालक यांना फोनद्वारे संपर्क करुन, ती डॉक्टर असल्याचे सांगुन, तिला ४ तोळे वजनाच्या बांगडया बनवायची ऑर्डर देण्याचे खोटे सांगुन, त्यांना साई आशिर्वाद हॉस्पीटल येथे बोलावून २ लाख रुपये ऍडव्हान्स  देते व हॉस्पीटलसाठी २ लाख रुपये सुट्टे करण्याचा बहाणा करुन त्यांना बोलावले असता श्रीराम ज्वेलर्सचे मालक हे २ लाख रुपये सुट्टे घेऊन साई आशिर्वाद हॉस्पीटल येथे गेले त्यावेळी आरोपी यानी फिर्यादीस, डॉक्टर मॅडमने सांगितलेली रक्कम आणली आहे का असे म्हणुन, तु मॅडमची बांगडयाची साईज घेऊन ये व आणलेले पैसे त्याच्याकडे देण्यास सांगुन फिर्यादीकडील २ लाख रुपये घेऊन, त्याची फसवणुक करुन निघुन गेला सदरबाबत नवघर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा गुन्हे शाखा, कक्ष १ काशिमीरा समांतर तपास करीत असताना तांत्रिक विश्वलेषनावरुन महिलेचे आवाजात बोलून फसवणुकीचा गुन्हा करणारे आरोपी १) मनिष शशीकांत आंबेकर, नागीनदासपाडा, नालासोपारा पूर्व, २) अन्वर अली कादीर शेख, कर्जत, जि. रायगड हे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने  त्यांना अटक करुन त्यांच्याकडून  रोख रक्कम ०९,५५०/- रुपये व एकूण ०३ मोबाईल हस्तगत करण्यात  आले आहेत. पोलिसांनी आरोपींची अधिक चौकशी केली असता  त्यांनी १) नवघर, २) भाईंदर, ३) आचोळे, ४) दादर, मुंबई, ५) लोणीकंद, पूणे ज्वेलर्स, ६) सहकार नगर, पूणे येथे मेडीकल ७) स्वारगेट, पूणे येथील  रक्तपेढी ८) कोपरखैराणे, नवी मुंबई छञपती संभाजी महाराज पतपेढी ९) खांदेश्वर, नवी मुंबई मेडीकल १०) खांदेश्वर, नवी मुंबई मराठा ज्वेलर्स ११) मुंबई नाका, नाशिक चितळे स्वीट १२) कळंबोली येथे राधीका ज्वेलर्स १३) शिवाजीचौक पनवेळ ज्वेलर्स दुकानदार १४) शाहुपूरी, कोल्हापूर वेलनेस मेडीकल १५) मिरारोड, शांतीपार्क येथील शबनम ज्वेलर्स तसेच गुजरात राज्य येथील १६) वापी १७) वलसाड १८) काकोदरा, सुरतसिटी, व १९) सुरत रेल्वे स्टेशन जवळील जनरल स्टोर्स येथे असे एकूण १९ ठिकाणी गुन्हे केले असल्याची माहिती दिली.  सदर ठिकाणांपैकी ०५ पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असुन उर्वरीत १४ पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल आहेत.

सदरची कामगिरी श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १, काशिमीराचे पो. नि. श्री. अविराज कुराडे, स.पो.नि. कैलास टोकले, पुष्पराज सुर्वे, स. फौ संदीप शिंदे, किशोर वाडीले, संजय पाटील, पो. हवा. संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, सचिन सावंत, प्रफुल्ल पाटील, समीर यादव, पो.अंम.प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी तसेच पो. अंम. कुणाल सावळे, सायबर विभाग यांनी केली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply