विरार : स्वस्त दरात फ्लॅट/रूम विक्रीसाठी उपलब्ध असल्याची हाऊसिंग डॉट कॉम पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने जाहिरात देऊन फसवणुक करणा-या आरोपींना गुन्हे शाखा, कक्ष-३ विरार यांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा परिसरात काही महिन्यांपासून हाऊसिंग डॉट कॉम पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने स्वस्त दरात फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात करून सामान्य नागरिकांना फसवणारी टोळी सक्रिय झाली होती अश्या वाढत्या तक्रारी पाहून या प्रकाराचा छडा लावण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपींचा शोध घेवुन या गोष्टींना आळा घालावा असे पोलीस पथकास सांगितले होते .
त्यानुसार पोलीस उप आयुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष-३ विरारचे पोलीस पथक यांनी संशईत आरोपींची गुप्त बातमीदाराच्या मार्फतीने माहिती मिळवुन आरोपी १) नसिम बुंदन खान वय – ४२ वर्षे, रा. गोरेगाव पुर्व, मुंबई २) अल्ताफ चांद शेख वय – २४ वर्षे, रा. नालासोपारा पश्चिम, ता. वसई, ३) आशिषकुमार जगदीश सिंग ऊर्फ शेखर सिंग वय – ४५ वर्षे, रा. विरार पश्चिम, ४) दिनेशकुमार मोहनलाल बिष्णोई वय -२१ वर्षे, रा. नालासोपारा पश्चिम, ता. वसई, यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली असता त्यांनी यांनी स्वस्त दरात घर विकत घेणाऱ्या सामान्य नागरीकांना हेरुन वेगवेगळया फर्मच्या नावे संपर्क साधुन आरोपी नसिम बुंदन खान याच्या नावावर असलेले घर डी/५०४, ऑरेंज हाईस्ट नालासोपारा पश्चिम तसेच इतर सदनिका स्वस्त दरात विक्री करीत असल्याचे भासवुन सदर सदनिकाच्या खरेदी व्यवहाराचे पैसे हे बनावट कागदपत्राव्दारे बोगस बॅक खाते उघडुन नागरिकांची फसवणूक करीत असत . अश्या प्रकारची कागदपत्रे बनवून त्यांनी ३४ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे पोलिसांसमोर कबूल केले आहे.तसेच आरोपी यांचा नालासोपारा येथील ५ दाखल गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झालेला असुन आरोपी यांना नालासोपारा पोलीस ठाण्या कडील दाखल गुन्हा मध्ये पुढील कारवाई करीता नालासोपारा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेले असुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
वरील कामगिरी डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे), मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.नि/ श्री. विलास सुपे नेम -नालासोपारा पोलीस ठाणे, पो.नि/ प्रमोद बडाख, सपोनि/ किशोर माने, पोउपनिरी/ शिवाजी खाडे, पोउपनिरी/ उमेश भागवत, पो.हवा/ अशोक पाटील, पो.हवा/ मनोज चव्हाण, पो.हवा/ मुकेश तटकरे, पो.हवा/ शंकर शिंदे, पो.हवा/ सचिन घेरे, पो.हवा./सागर बारवकर, पो.ना/ मनोज सकपाळ, पो.अं./ राकेश पवार, पो.अं/ अश्विन पाटील, सर्व नेम- गुन्हे शाखा, कक्ष -३ यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.
